Thursday, April 25, 2024
Homeधुळेमाजी मंत्री डॉ. हेमंत देशमुखांसह 6 जणांवर गुन्हा

माजी मंत्री डॉ. हेमंत देशमुखांसह 6 जणांवर गुन्हा

धुळे । dhule । प्रतिनिधी

दोंडाईचा येथील व्यवहारात झालेल्या जमिनीची परस्पर विक्री (Mutual sale of land) करीत नंदुरबार येथील व्यापार्‍याची (merchant) सव्वा कोटी रूपयात फसवणूक (Fraud) करण्यात आली. याबाबत तक्रारी अर्ज देण्यात आला होता. त्यांच्या चौकशीअंती माजीमंत्री हेमंत देशमुख, रविंद्र देशमुख, राजेंद्र इंगळेंसह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

Beauty Part 2 : विवाह सोहळ्यात असा करा ब्राइडल मेकअप

याबाबत शेख फारूक शेख नजीर (वय 50 रा. राजीव गांधी नगर, नंदुरबार) या व्यापार्‍याने दोंडाईचा पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, दि.26 मे ते दि.19 ऑक्टोबर 2022 दरम्यान दोंडाईचा शहरातील सर्व्हे नं 56/1, 16 हजार चौ.मी. या जमिनीचे मुळ मालक हेमंत भास्कर देशमुख (रा. दोंडाईचा), राजेंद्र विष्णु इंगळे (रा.धुळे), अंबादास कन्हैयालाल मराठे (रा. दोंडाईचा), बापूसाहेब रविंद्र देशमुख (रा.दोंडाईचा) यांनी मिळकत सर्व्हे नंबर 56/9 ही फिर्यादी शेख यांना विक्री केली. त्यांचे नावे खरेदी खत करून देण्याबाबत फिर्यादी शेख यांना विश्वासात घेवून त्यांच्याकडून 16 लाख रुपये रोख स्वरुपात व 1 कोटी 4 लाख रुपये बँक खात्याव्दारे असे एकूण 1 कोटी कोटी 20 लाख रुपये स्विकारले.

तर उर्वरीत रक्कम 1 कोटी 12 रुपये स्विकारून मिळकतीचा खरेदी विक्रीचा व्यवहार फिर्यादी शेख यांचे करणे व्यवहारीक असतांनाही व सदर मिळकतीचा खरेदी विक्रीचा व्यवहार फिर्यादी शेख यांचा झालेला असल्याचे माहित असतांनाही त्यांनी सदरची मिळकत ही राजेंद्र इंगळे हा संपूर्ण खरेदी खतातील संमतीदार असे दर्शवून खोटया व बनावट खरेदी सौंदा पावत्या तयार करून दोंडाईचा शहरातील चंपालाल पारख व गणेशमल भुरमल बंब यांच्याशी संगनमताने कट कारस्थान रचले.

त्यांच्याकडून पैसे स्विकारून त्यांच्याशी करार करून तसे दि. 19 ऑक्टोबर 2022 रोजी रजिस्टर खरेदी खत करुन देवून व घेवून फिर्यादी शेख यांचा विश्वासघात केला. तसेच त्यांची अर्थिक फसवणूक केली. याबाबत शेख यांनी दि. 10 जानेवारी 2023 रोजी दोंडाईचा पोलिसात तक्रारी अर्ज दिला होता. त्यावर चौकशीअंती व पोलिस अधिक्षकांच्या परवानगीने वरील सहा जणांवर काल दोंडाईचा पोलिसात भादंवि कलम 420, 406, 437, 468, 469, 120 (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी हे करीत आहेत.

photos # फिंगर व नेल पेंटींगचा निसर्गदत्त राजा ‘आय.ए.राजा’

माझा काडीमात्र संबंध नाही

माझा या प्रकरणाशी काडीमात्र संबंध नाही. मी या आधीच दोंडाईचा पोलीस ठाण्यात संबंधित व्यक्तीच्या विरोधात माझी बेअब्रू केल्याची भा.द.वि. 499 व 500 अन्वये तक्रार दाखल केली आहे. मी जमिनीचा व्यवहार ज्या इसमाशी केला ती व्यक्ती आणि फिर्यादी यांच्यात व्यवहार बिनसला आहे. माझा यात कुठेही संबंध येत नाही, असे माजी मंत्री डॉ. हेमंत देशमुख यांनी दै. देशदूतशी बोलतांना सांगितले.

हिवाळ्यात असे करा तुमच्या त्वचेचे रक्षण !

- Advertisment -

ताज्या बातम्या