Wednesday, May 8, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचं निधन, ६३ व्या वर्षी घेतला अखेरचा...

मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचं निधन, ६३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबई | Mumbai

मुंबईचे माजी महापौर आणि ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते विश्वनाथ महाडेश्वर (Vishwanath Mahadeshwar) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. ते ६३ वर्षांचे होते. विश्वनाथ महाडेश्वर यांना मंगळवारी पहाटे दोन वाजता हृदयविकाराचा झटका आला. यानंतर त्यांची प्राणज्योत मालवली.

- Advertisement -

आज दुपारी दोन वाजता पार्थिव राजे संभाजी विद्यालय, सांताक्रूझ(पूर्व) येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यानंतर सायंकाळी ४ वाजता विश्वनाथ महाडेश्वर यांची अंत्ययात्रा निघेल. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दुपारी विश्वनाथ महाडेश्वर यांच्या अंत्यदर्शनासाठी जाणार आहेत. विश्वनाथ महाडेश्वर यांच्या अकाली निधनाने ठाकरे गटावर शोककळा पसरली आहे.

Char Dham Yatra : केदारनाथ, बद्रीनाथ मार्गांवर पुन्हा निसर्ग कोपला… थरकाप उडवण्याऱ्या घटनेचा VIDEO व्हायरल

विश्वनाथ महाडेश्वर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते आहेत. त्यांनी मुंबईचे महापौरपद भूषवले आहे. त्यांनी नागरिक शिक्षण समितीचे अध्यक्ष आणि स्थायी समितीचे सदस्य म्हणूनही काम पाहिले. विश्वनाथ महाडेश्वर २००२ मध्ये सर्वप्रथम मुंबई महापालिकेच्या नगरसेवकपदी निवडून आले. मार्च २०१७ ते नोव्हेंबर २०१९ या काळात विश्वनाथ महाडेश्वर यांची मुंबईच्या महापौरपदी नियुक्ती करण्यात आली.

महाराष्ट्रात चाललंय काय? रोज सरासरी ७० मुली गायब, महिन्याचा आकडा डोकं सुन्न करणारा

- Advertisment -

ताज्या बातम्या