अनिल देशमुख यांची दिवाळी तुरुंगात, ६ नोव्हेंबरपर्यंत कोठडी

अनिल देशमुख यांची दिवाळी तुरुंगात, ६ नोव्हेंबरपर्यंत कोठडी
गृहमंत्री अनिल देशमुख Courtesy : Facebook/Anil Deshmukh

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

१०० कोटींच्या कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीकडून माजी गृहमंत्री अनिल देशमुख (NCP leader Anil Deshmukh) यांना अटक करण्यात आली होती. आज ईडीच्या न्यायालयाने (ED Court) त्यांना पाच दिवशांची कोठडी सुनावली. यामुळे अनिल देशमुख यांची दिवाळी आता तुरुंगात जाणार आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख
सलमानने सांगितले, त्याची कोट्यावधीची मालमत्ता कोणाला देणार?

मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी (money laundering case)कोठडी सुनावण्यात आल्याने देशमुख यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. ६ नोव्हेंबरपर्यंत अनिल देशमुख (Anil Deshmukh)ईडीच्या कोठडीत राहणार आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून बेपत्ता असलेले अनिल देशमुख सोमवारी सकाळी ईडीसमोर हजर झाले. त्यानंतर त्यांची १३ तास चौकशी केल्यावर त्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर मंगळवारी त्यांना मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएल कोर्टात हजर करण्यात आले. अनिल देशमुखांच्या वकिलांनी त्यांच्याशी बोलण्याची परवानगी कोर्टाकडे मागितली. ईडीकडून या मागणी विरोध करण्यात आला. मात्र, कोर्टाने वकिलांना त्यांच्याशी बोलण्याची परवानगी दिली.

गृहमंत्री अनिल देशमुख
शाहरुखने म्हटले होते, मुलाने ड्रग्स घ्यावे, डेटींग करावी अन...

न्यायालयात ईडीने अनिल देशमुख यांची १४ दिवसांची कोठडी मागितली होती. विविध तपास करण्यासाठी ईडीने कोठडी वाढवून मागवली होती. यावर देशमुख यांच्या वकिलांनीही युक्तीवाद केला.

अनिल देशमुखांकडून कोठडीला विरोध

अनिल देशमुख यांना उच्च रक्त दाबाचा त्रास आहे, तसंच हृदयविकाराचा त्रास आहे, त्यामुळे त्यांना कस्टडी देऊ नये, असा युक्तीवाद अनिल देशमुख यांच्या वकिलांनी केला होता. पण न्यायालयाने अनिल देशमुख यांना ६नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावली. ६ नोव्हेंबरनंतर अनिल देशमुख यांना पुन्हा न्यायालयात हजर केलं जाणार आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख
दिवाळीत आले हे आयपीओ, तुम्ही गुंतवणूक केली का?

काय आहे प्रकरण?

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचे आरोप केले होते. त्यानंतर अनिल देशमुख यांच्या घरावर ईडी, सीबीआय, आयकर विभागाने छापेमारी केली होती. त्यामुळेच देशमुखांना गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. गेल्या अनेक दिवसांपासून देशमुखांना ईडीने समन्स बजावले होते. तब्बल पाच समन्स बजावून देखील अनिल देशमुख चौकशीसाठी हजर झाले नव्हते. त्यांच्याविरोधात लूक आऊट नोटीस देखील जारी करण्यात आली होती. न्यायालयाने ईडीच्या कारवाईपासून कुठलाही दिलासा नाही, असं म्हटल्यानंतर शेवटी अनिल देशमुख सोमवारी ईडीच्या कार्यालयात हजर झाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com