
मुंबई । Mumbai
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल देशमुख हे तब्बल १ वर्ष, १ महिना आणि २७ दिवसांनी जेलबाहेर आले आहेत.
सीबीआयने त्यांच्या जामिनाला स्थगिती देण्यासाठी दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली, यानंतर अनिल देशमुख यांचा जामिनाचा मार्ग मोकळा झाला. १ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर अनिल देशमुख यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.
ईडी आणि सीबीआय प्रकरणात मागील अनेक दिवसांपासून त्यांच्याकडून जामिनासाठी प्रयत्न सुरू होता. त्यांना आधी ईडी प्रकरणात आणि नंतर सीबीआय प्रकरणात जामीन मंजूर झाला. मात्र, सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यासाठी वेळ मागितल्याने त्यांचा तुरुंगातील मुक्काम वाढला होता. अखेर आज (२८ डिसेंबर) अनिल देशमुख तुरुंगाबाहेर आले.