Wednesday, May 8, 2024
Homeदेश विदेशजपानच्या माजी पंतप्रधानांवर गोळीबार; प्रकृती गंभीर

जपानच्या माजी पंतप्रधानांवर गोळीबार; प्रकृती गंभीर

दिल्ली । Delhi

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये शिंजो आबे जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

- Advertisement -

शिंजो यांच्या छातीवर दोन गोळ्या झाडण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. तसंच, आबे यांच्यावर गोळी झाडल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.

शिंजो आबे यांनी २०२० मध्ये पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला होता. प्रकृती बरी नसल्याने त्यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला होता.

शिंजो अबे हे जपानच्या पंतप्रधानपदी सर्वाधिक काळ राहिलेले पहिलेच पंतप्रधान आहेत. भारत आणि जपान यांच्यातील संबंध वृद्धिगंत करण्यास शिंजो अबे यांचा मोठा वाटा आहे.

तसेच, २०१७ मध्ये जपानचे पंतप्रधान असताना शिंजो अबे हे भारतात आले होते. त्यावेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद विमानतळावर त्यांचे स्वागत केले होते. शिंजो अबे यांची गळाभेट घेत नरेंद्र मोदींनी त्यांचे स्वागत केले होते.

जपानमध्ये संसदेच्या वरिष्ठ सभागृहासाठी निवडणुका होणार आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने शिंजो आबे हे प्रचार करत होते. त्याचवेळी त्यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याची ही घटना घडली.

- Advertisment -

ताज्या बातम्या