भारताचे माजी क्रिकेटपटू चेतन चौहान यांचे निधन

भारताचे माजी क्रिकेटपटू चेतन चौहान यांचे निधन

नवी दिल्ली:

भारताचे माजी क्रिकेटपटू चेतन चौहान यांचे रविवारी करोना व्हायरसमुळे निधन झाले. करोना व्हायरसची लागण झाल्यानंतर. गुरूग्राम येथील मेदांता रुग्णालयात चौहान यांना दाखल करण्यात आले होते. उत्तर प्रदेशमधील योगी सरकारमध्ये ते कॅबिनेट मंत्री होते.

चौहान यांनी भारताकडून ४० कसोटी आणि सात वनडे सामने खेळले होते. क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर ते राजकारणात गेले. उत्तर प्रदेशमधून चौहान दोन वेळा अमरोहा मतदार संघातून लोकसभा निवडणुकीत विजयी झाले होते.

AD
AD
No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com