Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्याउद्धव ठाकरेंना पुन्हा मोठा धक्का; 'या' बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

उद्धव ठाकरेंना पुन्हा मोठा धक्का; ‘या’ बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई | Mumbai

निवडणूक आयोगाने (Election Commission) शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटाला दिल्यानंतर ठाकरे गटाला (Thackeray Group) मोठा धक्का बसला आहे. त्यानंतर ठाकरे गटाचे अनेक नेते आणि कार्यकर्ते शिंदेंच्या शिवसेनेत (Shivsena) प्रवेश करत आहेत…

- Advertisement -

राज्यपालांच्या ‘त्या’ भूमिकेवर सुप्रीम कोर्टाचे ताशेरे

काल उद्धव ठाकरेंचे (Uddhav Thackeray) निकटवर्तीय आणि माजी मंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांचे पुत्र भुषण देसाई यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (CM Eknath Shinde) उपस्थितीत शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला होता.

… म्हणून सूरत-गुवाहाटीला जाणाऱ्या आमदारांना थांबवलं नाही; उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

यानंतर आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला असून ठाकरे गटाचे नेते व माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत (Deepak Sawant) आज एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी सावंत यांचे पक्षात स्वागत केले.

कोण आहेत दीपक सावंत?

दीपक सावंत हे विधानपरिषदेचे (Legislative Council) माजी सदस्य होते. शिवसेनेकडून त्यांनी मुंबई पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. जुलै २००४ मध्ये त्यांची पहिल्यांदा विधानपरिषदेवर वर्णी लागली. त्यानंतर २००६ आणि २०१२ मध्ये ते पुन्हा निवडून आले. तर डिसेंबर २०१४ मध्ये फडणवीस सरकारच्या काळात दीपक सावंत यांना सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाचे राज्यमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले होते.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या