Saturday, May 11, 2024
Homeमहाराष्ट्रमाजी आरोग्यमंत्र्यांच्या गाडीला भीषण अपघात; रुग्णालयात दाखल

माजी आरोग्यमंत्र्यांच्या गाडीला भीषण अपघात; रुग्णालयात दाखल

मुंबई | Mumbai

माजी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या गाडीला भीषण अपघात झाला आहे. एका डंपरनं सावंतांच्या कारला धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. सावंत जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. दीपक सावंत हे आज सकाळी पालघरला आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या मृत्यूसंदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी जात असताना काशिमीरा भागात त्यांच्या गाडीला अपघात झाला आहे.

डॉ. दीपक सावंत यांच्या गाडीला डंपरने मागून जोरदार धडक दिली. त्यांच्या मानेला आणि पाठीला दुखापत झाली असून त्यांच्या कारचे मोठे नुकसान झाले आहे. घटनास्थळावरून त्यांना पोलिसांनी मुंबईत उपचारासाठी अँम्ब्युलन्सने पाठवले आहे.

मागील काही दिवसांपासून नेत्यांच्या अपघातात वाढ झाली आहे. सुदैवाने अपघातात नेत्यांचा जीव वाचला आहे. आतापर्यंत बच्चू कडू, योगेश कदम, जयकुमार गोरे, धनंजय मुंडे या सगळ्या नेत्यांचे अपघात झाले आहेत. सुदैवाने सगळ्या नेत्यांची प्रकृती नीट आहे. मात्र नेत्यांच्या होत असणाऱ्या अपघातांमुळे अपघात की घातपात असा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे.

अनेक अपघात रात्रीच होत असल्याचं चित्र आहे. माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांची गाडी नदीच्या पुलावरून ५० फूट खाली कोसळली होती. या अपघातात ते थोडक्यात बचावले होते. शिंदे गटात मंत्री असलेल्या तानाजी सावंत यांचा सुद्धा गेल्या वर्षी अपघात झाला होता. यात सावंत यांना कोणतीही दुखापत झाली नाही मात्र हा अपघात देखील रात्रीच्या वेळीच झाला होता.

आतापर्यंत झालेल्या अनेक अपघातांमध्ये निम्मे अपघात रात्रीच्यावेळी झाले आहेत. त्यामुळे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी रात्रीचा प्रवास टाळण्याचा मोठा सल्ला सगळ्यांना दिला आहे. मागील वर्षी विनायक मेटे यांचं रस्ते अपघातात दुर्दैवी निधन झालं होतं. त्यांचाही अपघात रात्रीच्या वेळीच झाला होता. त्यामुळे अपघात रोखण्यासाठी रात्रीचा प्रवास टाळा किंंवा रात्री गाडी चालवताना काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून वारंवार केलं जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या