
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
दोन दिवसापूर्वीच युवा नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी नाशिकचा दौरा (Nashik Tour) पार पाडला. त्यात त्यांना चांगल्या वाईट दोन्ही गोष्टींचा अनुभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र आजही सर्व मनपाचे माजी नगरसेवक (Ex-Corporator) शिवसेनेसोबत (Shivsena) असल्याची खात्री त्यांना पटली होती...
या पार्श्वभूमीवर नाशिकच्या राजकीय वातावरणाविषयी चर्चा करण्यासाठी मातोश्रीवरून (matoshree) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडून नाशिकच्या माजी नगरसेवकांना आज भेटण्यासाठी बोलावले आहे. त्यांच्या आदेशावरून नाशिकमधील तीसहून अधिक माजी नगरसेवक मुंबईकडे रवाना झाले आहेत.
यावेळी काही माजी नगरसेवकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर शिवसैनिकांच्या मनात हळहळ व्यक्त होत होती. साहेबांना भेटण्यासाठी आम्ही उत्सुक होतो. तेव्हा आज निरोप आल्याने आम्हाला साहेबांना भेटण्यासाठी आनंद होत आहे.
आमची निष्ठा ही उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे आणि निष्ठाच इतिहास घडवू शकते याच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे, असे शिवसेनेचे माजी गटनेते विलास शिंदे (Vilas Shinde) यांनी सांगितले. यावेळी पक्षाशी एकनिष्ठ असल्याचे शपथपत्र या माजी नगरसेवकांकडून लिहून घेतले जाईल, अशी माहिती मिळत आहेत.