ठाकरे गटाचे काही माजी नगरसेवक, पदाधिकारी उद्या शिंदे गटात प्रवेश करणार?

ठाकरे गटाचे काही माजी नगरसेवक, पदाधिकारी  उद्या शिंदे गटात प्रवेश करणार?
USER

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिक मधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे काही नगरसेवक उद्या शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समजते. त्यासाठी आता काही माजी नगरसेवक, माजी नगरसेविका मुंबईकडे निघाल्याचे समजते.

नाशिक मधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे 15 ते 16 माजी नगरसेवक उद्या शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जात असून उद्याच्या प्रवेशासाठी काही शिवसेनेचे पदाधिकारी मुंबईच्या दिशेने रवाना झाली असल्याचे वृत्त आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गोटातून मात्र या बातमीला वावडी असल्याचे बोलले जात असले तरी संभाव्य बंडखोरांची चाचपणी करण्याचे काम वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून सुरू आहे.

शिंदे गटाकडून मात्र या वृत्ताला दुजोरा मिळत आहे प्रत्यक्षात उद्या होणाऱ्या घडामोडीनंतरच चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान उद्या सकाळी 11 वाजता प्रवेश केल्यानंतर नाशिकला जल्लोषाची तयारी सुरू झाली असल्याचे समजते.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com