माजी नगरसेवक बंटी तिदमे शिंदे गटात, मिळाली 'ही' मोठी जबाबदारी

माजी नगरसेवक बंटी तिदमे शिंदे गटात, मिळाली 'ही' मोठी जबाबदारी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक महानगरपालिकेतील शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि शिवसेनेच्या कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष असलेले बंटी तिदमे यांनी नुकताच शिंदे गटात प्रवेश केला आहे....

शिवसेनेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाहेर पडल्यानंतर नाशिक जिल्ह्यातून दोन आमदार आणि एका खासदाराने त्यांना पाठबळ दिले होते.

त्यानंतर नाशिक शहरातील काही नगरसेवक सुद्धा शिंदे गटात सामील होतील अशी चर्चा सुरू होती. परंतु आत्तापर्यंत उघडपणे कोणीही शिंदे गटात गेले नव्हते. आता बंटी तिदमे यांनी शिंदे गटात दाखल झाले असून त्यांना नाशिक शहराच्या महानगरप्रमुखपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com