कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी रुग्णालयात दाखल

सोनिया गांधी
सोनिया गांधी

नवी दिल्ली | New Delhi

काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना बुधवारी (दि.०४ रोजी) गंगाराम रुग्णालयात (Gangaram Hospital) दाखल करण्यात आले आहे. नियमित तपासणीसाठी त्यांना रुग्णालयात दाखल केल्याचे समजते.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सोनिया गांधी यांच्यासोबत कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) या देखील रुग्णालयात असल्याचे सांगितले जात आहे. मंगळवार (दि.०३ रोजी) सोनिया गांधींना अस्वस्थ वाटत होते. त्यामुळे कॉंग्रेस खासदार राहुल गांधी आणि प्रियंका गांधी उत्तर प्रदेशातील ( Uttar Pradesh) प्रवेश करणाऱ्या भारत जोडो यात्रेत ७ किलोमीटर पायी चालून दिल्लीला ( Delhi)परतले होते. त्यानंतर राहुल गांधी आज सकाळी ६ वाजता बागपत जिल्ह्यातून भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि सोनिया गांधीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यावेळी आई-मुलाच्या नात्यातील एक अनोखा क्षण पाहायला मिळाला होता.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com