
नवी दिल्ली | New Delhi
पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल यांचं वयाच्या 95व्या वर्षी निधन झालं. त्यांच्यावर मागील काही दिवसांपासून मोहालीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. प्रकाशसिंग बादल हे पाच वेळा पंजाबचे मुख्यमंत्री राहिले आहेत.
त्यांच्या निधनामुळे संपूर्ण पंजाबमध्ये शोककळा पसरली आहे. प्रकाश सिंह बादल हे अकाली दलाचे वरिष्ठ नेते होते. तसेच ते तब्बल पाच वेळा पंजाबचे मुख्यमंत्री राहिले असल्याने पंजाबच्या जडणघडणीत त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे.
शिरोमणी अकाली दलचे अध्यक्ष सुखबीर बादल हे त्यांचे पुत्र आहेत. प्रकाश सिंह बादल यांचा जन्म 8 डिसेंबर 1927 ला पंजाबमधील एका छोट्याशा गावात जाट सीख परिवारात झाला होता. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण पंजाबमध्ये शोक व्यक्त होत आहे.
केंद्र सरकारने बादल यांच्या निधनानंतर दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. तसेच देशाच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोकसंदेश व्यक्त केला आहे.