भाजपच्या माजी मंत्र्यांचा उद्धव ठाकरेंच्या 'त्या' मागणीला पाठिंबा

भाजपच्या माजी मंत्र्यांचा उद्धव ठाकरेंच्या 'त्या' मागणीला पाठिंबा

मुंबई | Mumbai

शिंदे आणि ठाकरे गटातील वाद दिवसेंदिवस अधिकच चिघळत चालल्याचे दिसून येत आहे. एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) ठाकरे गटाला कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडली नाही. शिंदेंनी शिवसेना (Shiv Sena) या पक्षाच्या नावावर आणि चिन्हावर ताबाही मिळविला आहे.

या विषयावर केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) अलीकडेच आपला निर्णय स्पष्ट केला त्यानुसार, शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगाने शिंदे गटाचे आहे असे नमूद केले; मात्र आयोगाच्या या निकालामुळे राजकीय वर्तुळात वातावरण चांगलेच तापले असून, निवडणूक आयोगाच्या निकालावर उलटसुलट प्रतिक्रिया आल्या आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे संतापले असून त्यांनी आयोगाच्या भूमिकेवर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. ठाकरेंनी म्हटले आहे की, निवडणुका घेण्याचे काम निवडणूक आयोगाचे (Election Commission) असते, पक्षांतर्गत असणाऱ्या वादात निर्णय देण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे काय ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

भाजपच्या माजी मंत्र्यांचा उद्धव ठाकरेंच्या 'त्या' मागणीला पाठिंबा
एकनाथ शिंदे होणार नवे पक्षप्रमुख? आज शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारीणीची बैठक

तसेच पक्षाचे चिन्ह आणि नावावर दिलेला निर्णय पूर्णपणे घटनाबाह्य आहे, निवडणूक आयोगाचा हा निर्णय एकतर्फी असून आयोग बरखास्त करा, अशी मागणी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केली आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या या मागणीला भाजपच्या माजी मंत्र्याने समर्थन दर्शविले आहे.

भाजपचे माजी मंत्री सुब्रमण्यम स्वामी यांनी उद्धव ठाकरे यांच्या मागणीला पाठिंबा देतांना म्हटले आहे की, “केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार (Union Chief Election Commissioner Rajeev Kumar) यांना हटवण्याच्या उद्धव ठाकरेंच्या मागणीला मी पाठिंबा देत आहे. कारण त्यांचा याआधीचा वित्त मंत्रालयातील कार्यकाळ संशयास्पद होता”, असे ट्वीट च्या माध्यमातून भाजपचे माजी मंत्री सुब्रमण्यम स्वामी (Subramanian Swamy) यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com