Monday, April 29, 2024
HomeनाशिकVideo : पर्यटकांची धबधब्यावर मद्यपान करत हुल्लडबाजी; वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी पाण्यातच केली धुलाई

Video : पर्यटकांची धबधब्यावर मद्यपान करत हुल्लडबाजी; वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी पाण्यातच केली धुलाई

नाशिक | Nashik

सध्या पावसाळा (Rainy Season) सुरु असल्याने सगळीकडे निसर्ग हिरवाईने फुलून गेला आहे. त्यामुळे या निसर्गसौंदर्याची भुरळ निसर्गप्रेमींना पडत असून शहरातील बरेचसे नागरिक कुटुंब आणि मित्रांसह ग्रामीण भागातील निसर्गसौंदर्याचा आनंद लुटतांना दिसत आहेत. यात नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) त्र्यंबकेश्वर, दुगारवाडी धबधबा, पहिने, अंजनेरी गडासह आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत आहे…

- Advertisement -

Nashik Crime News : बंदुकीचा धाक दाखवून व्यावसायिकाला लुटणाऱ्याला अटक; गुन्हे शाखा युनिट १ ची कामगिरी

तर दुसरीकडे मात्र पर्यटनाच्या नावाखाली काही पर्यटकांकडून हुल्लडबाजी करून धुडगूस घातला जात आहे. अशातच आता त्र्यंबकेश्वर तालुक्यातील (Trimbakeshwar Taluka) पहिने (Pahine) येथील नेकलेस धबधब्यावर (Necklace Waterfall) हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्या पर्यटकांना वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी चांगलाच चोप दिल्याचे समोर आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पहिने येथे नेकलेस धबधबा असून हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची (Tourist) सध्या पावसाळ्यामध्ये मोठी गर्दी होत असते. तर धबधब्याच्या अलिकडे असणाऱ्या पेगलवाडी गावापासून ते पहिने पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसून येतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांची पार्किंग पाहायला मिळते.

Governor Appointed MLC : १२ आमदारांच्या नियुक्तीबाबत उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले ‘हे’ आदेश

काल (दि.३०) रोजी रविवार असल्याने पर्यटकांनी पहिने येथे मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. त्याचवेळी नेकलेस धबधब्यावर काही पर्यटकांची धिंगाणा घालत हुल्लडबाजी सुरू होती. यावेळी काही पर्यटकांनी मद्यसेवन करत धुडगुस घातल्याने वनविभागाच्या (Forest Department) कर्मचाऱ्यांनी संबधित पर्यटकांना धबधब्याच्या पाण्यातच चोप दिला.

Accident News : कार-कंटेनरचा भीषण अपघात; ४ जणांचा मृत्यू

दरम्यान, शनिवारी-रविवार हे विकेंडचे वार असल्याने या दोन्ही दिवशी त्र्यंबकेश्वरसह (Trimbakeshwar) आजूबाजूच्या परिसरात महाविद्यालयीन तरुण-तरुणींसह मोठ्या प्रमाणावर बाहेरून पर्यटक येतात. त्यामुळे हुल्लडबाजी, मद्यसेवन यासारखे प्रकार घडतात. यामुळे वनविभागाकडून धबधब्यांवर कर्मचारी तैनात करण्यात आले असून हुल्लडबाजी करणाऱ्यांवर नजर ठेवली जात आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

मोठी बातमी! राज्यपाल नियुक्त १२ आमदारांचे प्रकरण पुन्हा उच्च न्यायालयात; काय आहे कारण?

- Advertisment -

ताज्या बातम्या