पांजरापोळमध्ये वनविभागाचे सर्वेक्षण पूर्ण

पांजरापोळमध्ये वनविभागाचे सर्वेक्षण पूर्ण

जिल्हा प्रशासनाला अहवाल सादर

नाशिक । प्रतिनिधी Nashik

शहराजवळ असलेल्या पांजरापोळमध्ये एक लाखांहून अधिक वृक्षसंपदा असून येथे वन्यप्राण्यांचे अस्तित्व असल्याचे स्पष्ट झाले आहे.या भागात वनविभागाच्या कर्मचार्‍यांना सर्वेक्षण करताना वन्यप्राण्यांच्या अधिवासावर शिक्कामोर्तब झाले.

तरसाने प्रत्यक्षरित्या दर्शन देण्याबरोबरच वनामध्ये बिबट्या, तरसाच्या पाऊलखुणाही अनेक सरपटणाच्या प्रजातींचा वावर असल्याचे नैसर्गिक पुरावे वनविभागाच्या कर्मचार्‍यांना सर्वेक्षणात आढळून आल्या आहेत. सर्वेक्षणाचा अहवाल वनविभागाने नाशिकच्या तहसीलदारांकडे सोपविला आहे.

महापालिका हद्दीतील चुंचाळे येथील नाशिक पंचवटी पांजरापोळमधील जैवविविधतेचा मागील महिन्याच्या 28 तारखेपासून सरकारी यंत्रणांकडून अभ्यास सुरू करण्यात आला होता. महसूल, वन, कृषी, जलसंपदा, पशुसंवर्धन या सरकारी खात्यांकडून सर्वेक्षण करण्यात आले.या सर्व खात्यांना 10 तारखेपर्यंत अहवाल सोपवायचा होता.मात्र, काही विभागांना विलंब लागला.

वनविभागाने दिलेल्या अहवालात म्हटले आहे की,या भागात देशी झाडे, झुडुपवर्गीय वनस्पती, लहान रोपे, वन्यप्राणी अशी स्वतंत्र वर्गवारी करण्यात आली आहे. तब्बल दहा ते बारा दिवस सुमारे वीस वनकर्मचार्‍यांनी या वनसदृश परिसराचे निरीक्षण करत अभ्यास केल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे यांनी म्हटले आहे. वनविभागाने मोजणी केलेली देशी वृक्षसंपदा, वन्यप्राणी, वनौषधी प्रजातींची मोजदाद करत तयार केलेला अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मंत्रालयाला पाठविण्यात येणार आहे.

पांजरापोळ ट्रस्टच्या मालकीची 825 एकर जागा आहे. या ठिकाणी सुमारे अडीच ते पावणेतीन लाख इतकी वृक्षसंपदा असल्याचा पांजरापोळ संस्थेचा दावा आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पांजरापोळची आवश्यक तितकीच जागा घेतली जाईल, असे नाशिक दौर्‍यावर आले असता सांगितले होते.पांजरापोळ म्हणजे नाशिकची ऑक्सिजन फॅक्टरी असून ती वाचविण्यासाठी मोहीम सुरू केली होती. यामुळे पर्यावरणवाद्यांनी पांजरापोळची जैवविविधता अबाधित राखण्याची मागणी लावून धरली आहे.

पांजरापोळमधील वनसंपत्ती

* रोपे :1 लाख 31 हजार

* वृक्ष :1 लाख 9 हजार

* झुडपे :1 लाख 35 हजार

* तरस :05

* मोर : 60

* रानससा :15

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com