लाखोंचा विदेशी मद्यसाठा जप्त

राज्य उत्पादन शुल्कची मोठी कारवाई
लाखोंचा विदेशी मद्यसाठा जप्त

पुनदखोरे | वार्ताहर

विदेशी मद्य गुजरात राज्यात ( Gujrat State ) विक्रीसाठी नेते असताना राज्य उत्पादन शुल्क, नासिक मार्फत मोठी कारवाई करीत साधारण 11लाख, 93,000,(हजार) रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क नासिक कार्यालयाच्या (State Excise Nashik Offices)आधीपत्याखाली निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क कळवण विभाग यांनी नासिक - वणी रोडवर ( Nashik- Vani Road ) हॉटेल वंदेश समोर कसबे वणी गावात ता. दिंडोरी या ठिकाणी सापळा रचून अशोक लेलँड कंपनीचे चार चाकी मालवाहतूक करणारे वाहन क्र. एम. एच.48. ए. वाय.2935 या संशियित वाहनाची तपासणी केली असता, सदर वाहनात 100 लिटर क्षमतेचे 12 प्लास्टिक ड्रम दिसून आले.

याबाबत वाहन चालकास विचारले असता, त्या ड्रममध्ये साबण निर्मितीसाठी वापरण्यात येणारे एस. एल. ई. एस. जेल असल्याचे सांगण्यात आले. याप्रसंगी तपासणी केल्याने सदर प्लास्टिक ड्रमचे सिल तोडून झाकण उघडून पहिले असता त्यात प्रथमदर्शनी जेल दिसून आले. जेलच्या स्तराखाली महाराष्ट्र राज्यात निर्मित दादरा व नगरहवेली तसेंच दमण - दिव येथे ( महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित ) असलेला मद्यसाठा वाहतूक करतांना आढळून आल्याने संबधितांवर कारवाई करण्यात आली.

या कारवाईत ईम्परियल ब्लु व्हिस्की हा ब्रँड असलेल्या मद्याच्या सुट्ट्या बाटल्याचा साठा वाहतूक करताना आढळून आला. यात 525.6 ब. ली.चे एकूण (60 बॉक्स ), ईम्परीयल ब्लु व्हिस्कीच्या 750 मि. लि. क्षमतेच्या एकूण 240 सिलबंद बाटल्या (20 बॉक्स ), एक जिओ कंपनीचा मोबाईल त्यांचप्रमाणे 12 प्लास्टिक ड्रम तसेंच अशोक लेलँड कंपनीचे माल वाहतूक करणारे वाहन असा 11,93000 /- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात येऊन सर्वात मोठी कारवाई करण्यात आली.

आरोपी दीनानाथ सीताराम पाल वय( 46) मु. पो. उमेळमान. ता. वसई. जि पालघर. यास ताब्यात घेतले असून, इतर फरार आरोपीत वाहनचालक, मद्यसाठा पुरवठादार, खरेदीदार, विक्रीदार आदिवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाईत विजय सूर्यवंशी आयुक्त राज्य उत्पादन शुल्क, सुनील चव्हाण संचालक ( अंबलबजावणी व दक्षता ) राज्य उत्पादन शुल्क, अर्जुन ओहोळ, विभागीय उपआयुक्त, तसेंच एस . व्ही. गर्जे, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क नासिक यांच्या मार्गदर्शनाखाली कळवण विभागाचे निरीक्षक एस. के. सहस्त्रबुध्ये, एम. बी. सोनार, आर. एम. डमरे, जवान सर्वश्री डी. एन. आव्हाड, एम. जी. सातपुते, व्ही. टी. कुवर, एस. डी. पोरजे, पी. एम. वाईकर यांनी यशस्वीरित्या पार पाडली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास कळवण विभागाचे निरीक्षक एस. के. सहस्त्रबुध्ये करीत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com