Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यापुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज

पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

गेल्या आठवड्यात मुसळधार पावसाने ( torrential rain ) कोकण, मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रात ( Maharashtra ) धुमाकूळ घातला. हवामान विभागाने (Meteorological Department ) वर्तवलेल्या या अंदाजानुसार आठवड्यातील पहिले दोन-तीन दिवस काही भागांमध्ये पावसाचा जोर कमी होणार आहे, पण 29 जुलैपर्यंत अनेक भागांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.

- Advertisement -

विशेषतः रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे या जिल्ह्यांमध्ये अलर्ट देण्यात आला असून या ठिकाणी काळजी घेण्याचंही कुलाबा वेधशाळेने सांगितलं आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात या भागांमध्ये पावसाचा जोर थोडा कमी होणार आहे.

मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर, या भागांमध्ये मात्र काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या