
जळगाव jalgaon । प्रतिनिधी
हनुमानजी (Shri Hanuman) ब्रह्मचारी आहे त्यामुळे स्त्रीयांनी (women) त्यांची आराधना, मंदिरात जावून दर्शन घेवू नये हे चुकीचे आहे. उलट श्री हनुमान सर्व महिलांना आपल्या माते (mother) समान मानत असल्याने हनुमानजींचे पाठ करणे, आरती करण्याचा (Shri Hanuman Aarti) अधिकार (right)प्रथम स्त्रीयांना आहे, असे प्रतिपादन पुष्पानंद महाराज यांनी केले.
श्री हनुमंत चरित्र कथेचे आजपासून पांजरापोळ संस्थेत आयोजन करण्यात आले आहे. यापार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
श्री हनुमान कथा समितीतर्फे श्री हनुमान चरित्र कथे संबधित माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद मंगळवारी घेण्यात आली. पुढे बोलतांना पं. पुष्पानंद महाराज म्हणाले, की महिलांनी श्री हनुमान यांची आरती करावी की करू नये याबाबत समाजात एक प्रकारचे वेगवेगळ तर्क लावजे जातात.
हनुमानजी सर्व स्रियांना आपली माता समजतात. त्यामुळे महिलांनी श्री हनुमानाच्या चरणाला स्पर्श करून नमस्कार करू नये, मंदिरात त्यांची परिक्रमा करू नये असे सांगितले. तसेच जळगावात प्रथमच हनुमानजीची कथा सादर करण्याचा चांगला योग हनुमान जयंतीला चालून आला असे पं. पुष्पानंद महाराज यांनी सांगितले. तसेच श्री हनुमानाची प्रत्येकाने मनोभावाने आराधना केल्यास त्याचे फळ निश्चीत दिसून येते असे पुष्पानंद महाराज म्हणाले.
पत्रकार परिषदेला श्री हनुमत चरित्र कथा समिती अध्यक्ष विश्वनाथ जोशी, अशोक जाजू, अशोक कोठारी आदी उपस्थित होते.