Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्याVideo अवयव प्रत्योरोपणासाठी नाशिकमध्ये उभारला ग्रीन कॉरिडोअर

Video अवयव प्रत्योरोपणासाठी नाशिकमध्ये उभारला ग्रीन कॉरिडोअर

नाशिक (nashik)

नाशिकमधील ब्रेन डेड (brain dead)झालेल्या पुरुषाच्या अवयवदानाचा (
Organ donation) महत्त्वाचा निर्णय डॉक्टर (doctor), नातेवाइकांनी घेतला आणि वैद्यकीय पथकासह पोलिस (police)यंत्रणा कामाला लागली. अवयवांपैकी सर्वांत महत्त्वाचे मानले जाणारे यकृत ( Liver)व डोळे (eye)नाशिकमधील एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयाच्या (hospital) दिशेने निघाली. पोलिसांनी तयार केलेल्या ग्रीन कॉरिडोरमुळे (green corridor)१५ मिनिटांत पार पडले आणि दोन जणांना नवसंजीवनी मिळाली.

- Advertisement -

ब्रेनडेड झालेल्या व्यक्तीचे अवयव दान केल्यास त्या अवयवाच्या मदतीने कोणाचे तरी प्राण वाचू शकतात, याबाबत सर्वच स्तरांतील नागरिकांमध्ये जनजागृती होत आहे.ब्रेनडेड झालेल्या व्यक्तीचे अवयव दान केल्यास त्या अवयवाच्या मदतीने कोणाचे तरी प्राण वाचू शकतात, याबाबत सर्वच स्तरांतील नागरिकांमध्ये जनजागृती होत आहे. अवयवदानासाठी नागरिक स्वतः पुढाकार घेताना दिसतात. नाशिकमधील सिक्स सिग्मा हॉस्पिटलमध्ये किशोर शिंगाडा (वय ४३) दाखल झाले. त्यांच्‍या मेंदूत अचानक रक्‍तस्‍त्राव झाल्‍याने त्‍यांच्‍यावर डॉ. अतुल अहिरराव यांचे मार्गदर्शनाखाली शस्त्रक्रिया करण्यात आली. उपचारादरम्‍यान त्‍यांना मेंदुमृत घोषित केला. मेंदू मृत झाल्यानंतर जीवन संपुष्टात येते, असे डॉक्टरांनी कुटुंबियांना माहिती देत अवयवदान चळवळीविषयी माहिती दिली.

बॉलीवूड अभिनेत्यांच्या बॉडीगार्डचे पगार ऐकून थक्क व्हाल ?

पत्नीने अवयदानासाठी तयारी दर्शवली

शिंगाडा यांची पत्नी व मुलाच्या पुढाकाराने व सिक्स सिग्मा हॉस्पिटल प्रशासनाच्या समन्वयाने अवयव दान करण्याचा निर्णय घेण्यात आला. पुढील प्रक्रियेसाठी अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल व सुशिल आय हॉस्पिटल येथील प्रतीक्षेत असलेल्या रुग्णाना अवयव दान करण्यात आले. या कामी सिक्स सिग्मा हॉस्पिटल चे फिसिशियन डॉ अतुल अहिरराव, डॉ. शिरीष देशपांडे व डॉ आशिष जाधव, न्यूरो सर्जन डॉ निखिल भामरे व डॉ हर्षल चौधरी , कार्डिओलॉजिस्ट डॉ निर्मल कोलते, कार्डियाक सर्जन डॉ नितीन कोचर, सर्जन डॉ स्वप्नील पारख , ऑर्थो. डॉ अभय बोरसे, युरॉलॉजिस्ट डॉ प्रतिक्षीत महाजन , व्यवस्थापक डॉ विपुल चोपडा , मेडिकल सुप्रीटेंडेंट डॉ महावीर भंडारी, मेट्रन गौरव कोठावदे, प्रत्यारोपण समन्वयक पूनम हिरे – अमोल दुगजे, मॅनेजींग डायरेक्टर डॉ अनिल दुगड, चेयरमन संदीप खिवंसरा, डायरेक्टर सौ स्नेहा कुलकर्णी यांचे सहकार्य मिळाले.

असा उभारला ग्रीन कॅरिडोअर

बुधवारी सायंकाळी उशिरा ग्रीन कॉरिडोअरद्वारे अशोका मेडिकव्‍हर हॉस्‍पिटलमध्ये यकृत नेण्यात आले. सायंकाळी सात वाजून ३३ मिनिटांनी सिक्‍स सिग्‍मामधून रुग्‍णवाहिका निघाल्‍यानंतर अवघ्या १५ मिनिटांत म्हणजे ७ वाजून ४८ मिनिटांनी टीम अशोका मेडिकव्‍हर रुग्‍णालयात पोचली. प्रत्‍यारोपणासाठी मुंबईतील अपोलो हॉस्‍पिटलमधील प्रत्‍यारोपण शस्‍त्रक्रिया तज्‍ज्ञ डॉक्‍टर नाशिकला दाखल झाले होते. त्‍यांनी ही शस्त्रक्रिया केली. नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे, गंगापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रियाज शेख, सहाय्यक पोलिस आयुक्त सिताराम गायकवाड व इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी यासाठी सहकार्य केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या