'फुटबॉलचा राजा' काळाच्या पडद्याआड, महान खेळाडू पेले यांचं निधन

Pele
Pele

दिल्ली | Delhi

सर्व काळातील महान फुटबॉलपटूंपैकी एक असलेले पेले यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाले आहे. ते कोलन कॅन्सर तसेच हृदय आणि किडनीच्या समस्यांमुळे २९ नोव्हेंबरपासून रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांच्या निधनामुळे केवळ फुटबॉल जगतावरच नव्हे तर जगभरातील क्रीडाप्रेमींवर शोककळा पसरली आहे.

पेले यांची मुलगी केली नॅसिमेंटो (Kely Nascimento) हिने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट करत ही माहिती दिली आहे. ''आम्ही जे काही आहोत त्यासाठी तुमचे आभारी आहोत. आम्ही तुझ्यावर असीम प्रेम करतो, Rest in Peice असं कॅप्शन लिहित केलीने सर्व कुटुंबियांचा हात पेले याच्या हाताजवळ असल्याचा एक फोटो पोस्ट केला आहे.

पेले या नावाने प्रसिद्ध असलेले एडसन अरांतेस डो नासिमेंटो यांचा जन्म २३ ऑक्टोबर १९४० रोजी ब्राझीलच्या मिनास गेराइस राज्यातील ट्रेस कोराकोस येथे झाला. १९५८ मध्ये ब्राझीलच्या पहिल्या फिफा विश्वचषक विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच किशोरवयीन असलेल्या पेले यांनी फ्रान्सविरुद्धच्या उपांत्य फेरीत हॅट्ट्रिक केली होती.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com