धक्कादायक! अंध विद्यालयातील मुलांना अन्नातून विषबाधा

धक्कादायक! अंध विद्यालयातील मुलांना अन्नातून विषबाधा

मुंबई | Mumbai

अंध विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा (Food poisoning) झाल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे...

ताडदेव (Taddev) परिसरातील व्हिक्टोरिया मेमोरियल अंध विद्यालयातील (Victoria Memorial School for the Blind) ही घटना असून येथील सात विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

धक्कादायक! अंध विद्यालयातील मुलांना अन्नातून विषबाधा
रेल्वे इंजिनवर बिबट्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ

मंगळवारी दुपारच्या सुमारास काही विद्यार्थ्यांना उलट्या तर, काही विद्यार्थ्यांच्या पोटात वेदना जाणवू लागल्याने ही बाब उघडकीस आली. यापैकी सात विद्यार्थ्यांना त्रास जास्त जाणवू लागल्यामुळे त्यांना मुंबई महानगरपालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) नायर रुग्णालयात (Nair Hospital) दाखल करण्यात आले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

तर सात मुलांपैकी दोन मुले १२ वर्षाखालील आहेत. दोन मुलांना उलट्या आणि तापही आल्याचे समजते. या विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले असून त्रास होत असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये अनिकेत राऊत (१५), कल्पेश पवार (११), सुमित सरकार (११),  सोमनाथ (१४), अक्षय मोनिस्वारे (१४), सदाफ कुरेशी (१७) , परमेश्वर (१८) या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com