Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यारेल्वेमध्ये आता खाद्यपदार्थ व्हॉट्सॲपच्या माध्यमातून मागवता येणार

रेल्वेमध्ये आता खाद्यपदार्थ व्हॉट्सॲपच्या माध्यमातून मागवता येणार

नवी दिल्‍ली | New Delhi

भारतीय रेल्वेचा (Indian Railways) सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम असलेल्या भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळ मर्यादितने (IRCTC) विकसित केलेल्या विशेष  संकेतस्थळाच्या तसेच ई-कॅटरिंग (Catering) ॲप फूड ऑन ट्रॅकच्या माध्यमातून ई-खानपान सेवा सुरू केली आहे.

- Advertisement -

तसेच भारतीय रेल्वेने अलीकडेच रेल्वे प्रवाशांसाठी ई-खानपान सेवेच्या माध्यमातून खाद्यपदार्थ मागविण्यासाठी व्हॉट्सॲप (WhatsApp) संपर्क सुरू केला आहे. सुरुवातीला, व्हॉट्सॲप संपर्कांद्वारे ई-खानपान सेवांची दोन टप्प्यांत अंमलबजावणी करण्याची योजना आखण्यात आली आहे.

त्यामध्ये पहिल्या टप्प्यात www.ecatering.irctc.co.in या संकेतस्थळावर क्लिक केल्यानंतर ई-कॅटरिंग सेवा निवडण्यासाठी ई-तिकीट बुकिंग (Ticket booking) करणाऱ्या ग्राहकांना बिझनेस व्हॉट्सॲप नंबर संदेश पाठवला जाईल.

तसेच या पर्यायासह, ग्राहकांना ॲप डाउनलोड न करताही थेट आयआरसीटीसीच्या ई-खानपान संकेतस्थळाच्या माध्यमातून रेल्वेस्थानकाच्या मार्गावर उपलब्ध असलेल्या त्यांच्या पसंतीच्या रेस्टॉरंटमधून (Restaurant) त्यांच्या आवडीच्या खाद्यपदार्थांची मागणी नोंदवता येईल.

दरम्यान, निवडक रेल्वेगाड्या आणि प्रवाशांच्या ई-खानपान सेवेसाठी देखील व्हाट्सॲप क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्याद्वारे ग्राहकांचे अभिप्राय आणि सूचनांच्या आधारे, रेल्वे इतर गाड्यांमध्येही ही सुविधा सुरु करेल. सध्या ग्राहकांना दर दिवशी अंदाजे ५० हजार भोजनाची मागणी आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावरून व ॲपद्वारे उपलब्ध करून दिलेल्या ई-खानपान सेवांद्वारे पूर्ण केली जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या