गणेश विसर्जनासाठी नियमांचे पालन करा

मनपा आयुक्त कैलास जाधव यांचे आवाहन
गणेश विसर्जनासाठी नियमांचे पालन करा

नाशिक । प्रतिनिधी Nashik

महानगरपालिकेतर्फे Nashik Municipal Corporation यंदा पर्यावरणपूरक गणेशोत्सव 2021 Eco Friendly Ganesh Festival -2021 साजरा करण्यात येत आहे . तसेच उच्च न्यायालयाने नुकत्याच पीओपीच्या गणेश मूर्तींवर घातलेल्या बंदीच्या अनुषंगाने नदीपात्राचे होणारे प्रदूषण टाळण्यासाठी मनपातर्फे नाशिक शहरातील नागरिकांना शाडू मातीच्या गणेश मूर्ती Shadu Soil Ganesh Idols घरोघरी व सार्वजनिक ठिकाणी मंडळांमार्फत बसविणेकरिता आवाहन करण्यात आले होते.

मनपाच्या या आवाहनास शहरातील नागरिकांनी उत्तम प्रतिसाद देऊन पर्यावरण संवर्धनात आपले योगदान दिले . त्याचप्रमाणे गणेश विसर्जन करताना देखील नागरिकांनी पर्यावरण पूरक पद्धतीचा अवलंब करण्यात यावा, यासाठी नाशिक महानगरपालिका प्रयत्नशील आहे.

यासाठी गणेश विसर्जनाकरिता नागरिकांनी गणेश मूर्तींचे विसर्जन नदीपात्रात न करता त्यामूर्ती मनपाच्या मूर्ती संकलन केंद्रावर जमा कराव्यात तसेच जास्तीत जास्त नागरिकांनी आपल्या गणेश मूर्तींचे विसर्जन हे घरच्या घरीच करावे त्याकरिता अमोनियम बायकार्बोनेट पावडर मनपातर्फे वितरीत करण्यात येत असलेल्या केंद्रांवरून घेण्यात यावी.

मनपा आयुक्त कैलास जाधव NMC Commissioner Kailas Jadhav यांनी नागरिकांना गणेश विसर्जना करिता शासनाच्या सर्व नियम तसेच कोविड -19 च्या असलेल्या निर्बंधाचे , कायदा व सुव्यवस्थेचे पालन करून गणेश विसर्जन करण्याचे आवाहन केले आहे. तसेच जे नागरिक वरील नियमांचे उल्लंघन करतील त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्याचा इशारा यावेळी मनपा आयुक्तांनी दिला.

टँक ऑन व्हील उपक्रम

नाशिक महानगरपालिकेतर्फे गणेश विसर्जनकरिता दरवर्षी ऑनलाईन पद्धतीने स्लॉट बुक करण्याचा उपक्रम राबविण्यात येतो सदर उपक्रम हा या वर्षीही राबविण्यात येत आहे .तसेच कोविड-19 च्या अनुषंगाने मा. शासनाचे निर्देशाप्रमाणे विसर्जनासाठी नागरिकांची गर्दी न होऊ देण्यासाठी मनपातर्फे टँक ऑन व्हील हा अभिनव उपक्रम राबविण्यात आहे.

सदर उपक्रमात नागरिकांच्या मागणीप्रमाणे त्यांना ठराविक ठिकाणी गणेश विसर्जना करिता टँक उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मनपाच्या या उपक्रमाच्या अनुषंगाने शहरातील सर्व सहा विभागातील 50 किंवा त्यापेक्षा जास्त फ्लॅट्स असणार्‍या अपार्टमेंट यांच्याकडून विसर्जनाकरिता नोंदणी करण्यात येऊन टँक ऑन व्हील ची मागणी करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com