लोककलावंतांना मानधनाची प्रतिक्षा

अनेकांनी घेतला शेतीकाम ,रोजगार हमीचा आसरा
लोककलावंतांना मानधनाची प्रतिक्षा
न्यूज अपडेट/News Updateन्यूज अपडेट/News Update

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

ग्रामीण बोली भाषेतून समाजाचे प्रश्न समाजापर्यंत मांंडण्याचे कार्य करणारे लोककलावंंत (artists) सध्या कोरड्या आश्वासनांंचाच आस्वाद घेत आहेत. करोनाकाळात (Corona) राज्य सरकारने (State Government) जाहीर केलेले 5 हजार रुपयांचे मानधनही (Honorarium) अद्याप त्यांच्या पदरात पडलेले नाही. जाहीर करुन वर्ष लोटले तरी मानधन मिळत नसल्याने शेवटी कांदा लागवड, द्राक्ष बागेत जाऊन शेती कामांबरोबरच रोजगार हमीचा आसरा त्यांना घ्यावा लागला आहे...

राज्यात 42 हजार लोककलावंंत आहेत. अनेक पिढ्यांपासून ते कला जोपासत आहेत.विशेष म्हणजे जागरण, गोधळापासून ते भजन, कीर्तऩ, तमाशा, ऑर्केस्ट्रा या माध्यमातून त्यांनी कायमस्वरुपी रोजगार उपलब्ध करुन घेतला होता. त्यामुळे तेे कधीही शासनाच्या मदतीवर अवलंबूंन राहत नव्हते.

शासनाने फक्त चांगले वातावरण ठेवावे एवढीच त्यांची अपेक्षा होती. मात्र गेल्या दोन वर्षात करोनाने (Corona) त्यांचा हक्काचा रोजगार हिरावला आहे.थोडे काही वातावरण चांगले होत नाही. तोच निर्ंर्बंधांचे तुणतुणे सुरु होत आहे. त्यामुऴे त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न गहन झाला आहे. म्हणुुनच गेल्या वर्षी शासनाकडे त्ंयानी मानधन देण्याची मागणी केली होती.

त्यानंंतर सांंस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी प्रत्येकी पाच हजार रुपये देण्याचे आश्वासनही दिले होते. या घोषनेनंतर कलावंतांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या.

मात्र ते पाच हजार रुपये अजुनही ग्रामीण भागातील लोककलावंतापर्यंत पोचलेलेे नाही. त्यामुळे वाद्य, बासरी,डफ आडगळीत ठेऊन खुरपा हाती घेऊन शेती कामे सुरु केली आहेत.काही जण रोजगार हमीचा आसरा घेत कुटुंबाला सावरत आहेत.

दोन वर्ष त्यांनी कशीबशी तग धरली. मात्र आता तिसर्‍या वर्षातही मागच्या सारखेच सुरु राहीले तर मात्र ग्रामीण भागातील बहुजन समाजातील लोक कलावंंत लोककलेपासून दुरावल्याशिवाय राहणार नाहीत.राज्यातील कलावंतांच्या कलेचा सन्मान व्हावा म्हणून मानधनही दिले जातेे. पण, ते केव्हा मिळणार हे निश्चित नाही.खात्यात पैसे केव्हा भरणार, असा सवाल ते सरकारला करत आहेत.

शिक्षण (Education) नसल्यानेही तमाशा कलाकारांंच्या अडचणीं वाढल्या आहेत. गावोगाव फिरून मिळालेल्या पैशातील बराच हिस्सा कुटुंबासाठी खर्च करावा लागल्याने त्यांना बचत करणे शक्य झाले नाही.

जन्मभर पोसणारा हाच कलावंत वृद्धत्वाकडे झुकला आहे. नातेवाइक त्याच्याकडे पाठ फिरवत आहेत आणि तो सरळ रस्त्यावरच येत आहे. पडेल ती कामे करून गुजराण करण्याची वेळ या कलाकारांवर येत आहे. याकाळात त्यांची काळजी, देखभाल करण्यासाठी कोणीही पुढे येत नाहीत ही त्यांची खंत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com