'उत्तर भारतात धुक्याचा थर तर उत्तर महाराष्ट्रात थंडीचा भर'

'उत्तर भारतात धुक्याचा थर तर उत्तर महाराष्ट्रात थंडीचा भर'

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

काश्मीर (Kashmir) खोरे, हिमाचलमधील (Himachal) अति थंडी (cold) व बर्फबारीमुळे (snowfall) पश्चिम राजस्थानच्या वायव्ये दिशेकडून सह्याद्री व सातपुडा खिंडीतून

उत्तर महाराष्ट्रात उतरणाऱ्या थंडीमुळे नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगांव तसेच नगर, पुणे, औरंगाबाद जिल्ह्यात दि.२३ ते २७ डिसेंबर दरम्यान (५ दिवस) चांगलीच थंडी (cold) जाणवण्याची शक्यता आहे. उर्वरित महाराष्ट्रात थंडी असेल पण तीव्रता काहीशी कमी जाणवेल, असा अंदाज निवृत्त हवामान तज्ञ माणिकराव खुळे (Retired Meteorologist, Manikrao Khule) यांनी वर्तविला आहे.

महाराष्ट्रात पाऊस नाही

बंगालच्या (Bengal) उपसागरातील कमी दाब क्षेत्राचे तीव्र कमी दाब क्षेत्रात रूपांतर झाले असुन येत्या ३-४ दिवसात श्रीलंका (Sri Lanka) किनार पट्टीवरून कन्याकुमारीच्या (Kanyakumari) टोकापर्यंत पोहोचेल. नाताळ (christmas) दरम्यान किंवा त्यानंतर तामिळनाडू, केरळ, आंध्रप्रदेश व कर्नाटकामध्ये तुरळक ठिकाणी मध्यम पावसाची (rain) शक्यता जाणवते. महाराष्ट्रावर या वातावरणाचा कोणताही परिणाम जाणवत नसुन महाराष्ट्रात पाऊस नाही. जास्तीत जास्त दक्षिण महाराष्ट्रातील जिल्ह्यात क्वचित ठिकाणी ढगाळ वातावरणाची (Cloudy weather) शक्यता जाणवते.

संपूर्ण इंडो गंगेचे मैदानातील पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार राज्यात घनदाट धुक्याची (fog) चादरीत लपेटले असुन दृश्यता ५० मीटरच्या खाली सरकली आहे. पर्यटनाच्या (Tourism) उच्चतम रहदारी कालावधीत सध्या हवाई वाहतूकीतीच्या उतरण व उड्डाणावर व रस्ते दळणवळणावर ८-१० दिवस सकाळच्या प्रहरात अडचणी जाणवू शकतील.

झंजावातात अधिक काळ लोटल्यास न विस्कळणारे धुक्याचे पार्सल (गाठोडे) अति थंडी, आर्द्रता व जमिनीलगतच्या उच्चं हवेच्या दाबामुळे घनदाट धुक्यातून दळणवळण बाधित तसेच धोकादायक ठरते.उत्तर भारताबरोबर पुर्वोत्तरातील ७ राज्यातही तीव्र नसला तरी धुक्याचा परिणाम सध्या जाणवत आहे, असेही खुळे यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com