दलित, मुस्लिम व परप्रांतीय मतांवर समाजवादी व एमआयएम ‘नजर’

jalgaon-digital
3 Min Read

नाशिक | प्रतिनिधी Nashik

महापालिका निवडणुकीच्या (Municipal elections) तयारीला सर्वच राजकीय पक्षांनी (Political party) वेग दिला आहे. मोठ्या पक्षांसह छोट्या पक्षांची तयारी देखील जोरदारपणे सुरू झाली आहे. अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांच्या समाजवादी पार्टी (Samajwadi Party) तसेच खा.असदुद्दीन ओवेसी (MP Asaduddin Owaisi) यांच्या एमआयएमच्या (MIM) स्थानिक पदाधिकार्‍यानी देखील उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे.

दलित, मुस्लिम (Muslim) तसेच परप्रांतीय मतदारांवर या दोन्ही पक्षांची नजर आहे. ज्या प्रभागात दलित, मुस्लिम व परप्रांतीय मतांची संख्या जास्त आहे, अशा ठिकाणी हे दोन्ही पक्ष आपले उमेदवार देतील अशा प्रकारे नियोजन सुरू असल्याचे येत आहे. मात्र या छोट्या पक्षांमुळे मोठ्या पक्षांचे गणित बिघडण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.

महानगरपालिका निवडणुकीसाठी आता फक्त काही महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. त्याचप्रमाणे काही लहान पक्षांनी देखील निवडणुकीत (election) उतरण्याची तयारी सुरू केली आहे. मध्य नाशिक (Central Nashik), सातपूर (satpur) व नाशिक रोड (nashik road) आदी भागात या पक्षांचे उमेदवार राहणार असल्याचे म्हटले जात आहे. समाजवादी पार्टीच्या (Samajwadi Party) वतीने मुशीर सय्यद (Mushir Sayyad) तसेच शेख सलीम अब्बास (Sheikh Salim Abbas) हे नगरसेवक (Corporator) म्हणून महापालिकेत गेलेले आहे.

मात्र या नंतर समाजवादी पक्षाकडून कोणीही नगरसेवक म्हणून महापालिकेत गेलेला नाही. तर एमआयएम पक्षाचे वतीने देखील निवडणुकीत उतरण्याची तयारी सुरू केली आहे. एमआयएमने नव्याने नाशिकला शहराध्यक्ष दिले असून यामुळे मागील काही काळात पक्षसंघटन देखील मजबूत होतांना दिसत आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एमआयएम अध्यक्ष खा. असदुद्दीन ओवेसी यांची सभा देखील नाशिकमध्ये होणार असल्याची चर्चा आहे.

दरम्यान, मुस्लीम तसेच दलित मतांवर राजकारण करणार्‍या एमआयएम पक्ष किती जागा लढवणार किंवा कोणाबरोबर जाणार याबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याचे समजते. मात्र यंदा पक्षाच्या वतीने महापालिका निवडणूक (Municipal elections) लढण्याचा निर्धार करण्यात आला आहे. दुसरीकडे उत्तर भारतीय तसेच मुस्लीम व दलित समाजाच्या मतांवर नजर असलेल्या समाजवादी पक्षाने देखील यंदाची महापालिका निवडणूक लढण्याची जोरदार तयारी केली आहे.

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री तथा समाजवादी पक्ष प्रमुख अखिलेश यादव यांची नाशिकमध्ये सभा घेण्यावर चर्चा सुरू असल्याचे समजते आहे. मोठ्या पक्षातील दिग्गज उमेदवारांसमोर छोट्या पक्षातील उमेदवार कडवे आव्हान उभे करू शकतात, असा आजवरचा अनुभव आहे. तसेच राजकारणात कोणत्याही प्रकारची कमतरता ठेवण्यात येत नाही. यामुळे ऐनवेळेपर्यंत काय होते हे सांगणे कठीण असले तरी समाजवादी पार्टी तसेच एमआयएम पक्ष नाशिक महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने कामाला लागल्याचे दिसत आहे.

महाविकास आघाडीत सपा येणार

राज्यात तयार झालेल्या शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीची सत्ता आहे. तर आगामी महापालिका निवडणुका देखील आघाडी म्हणून लढणार असल्याचे काही नेत्यांचे म्हणणे आहे. तरी यामध्ये नाशिक महापालिकेत समाजवादी पार्टीला स्थान मिळणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

जर समाजवादी पार्टीला महाविकास आघाडीत स्थान मिळाले तरी किती जागा समाजवादी पार्टीच्या वाट्याला येतात याचा विचार देखील सुरु असल्याचे समजते. तर दुसरीकडे एमआयएम पक्षाला स्वतंत्र लढण्याशिवाय पर्याय दिसत नाही. मागच्या वेळेला वंचित आघाडी म्हणून त्यांनी निवडणूक लढवली होती. मात्र यंदा अशी कोणत्याही प्रकारची चर्चा नसल्यामुळे एमआयएम स्वतंत्र निवडणूक लढणार असल्याचे समजते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *