स्वप्ने साकारण्यासाठी कृतीवर भर द्या!

स्वप्ने साकारण्यासाठी कृतीवर भर द्या!

नाशिक। प्रतिनिधी Nashik

देवीची अनेक रूपे आहेत. त्याच देवीचे रूप असणार्‍या महिला वेगवेगळ्या कार्यक्षेत्रात नशीब आजमावताना दिसतात. चूल आणि मूल या पलीकडे जाऊन घराबाहेर आणि त्याही पुढे आंतरराष्ट्रीय पातळीवर (Internationally) महिला (Women) आपला ठसा उमटवत आहेत.

प्लम्बिंगसारख्या (Plumbing) अवघड कामात स्वकौशल्याचा योग्य ठिकाणी उपयोग करून त्याच उद्योगात ऐश्वर्या रमण (Aishwarya Raman) सहमालकपदापर्यंत पोहोचल्या आहेत. नवरात्रोत्सवानिमित्त (navaratrotsav) आयोजित ‘देशदूत नवदुर्गा’ (Deshdoot Navdurga) उपक्रमात ऐश्वर्या यांनी मनोगत व्यक्त केले. ‘देशदूत’च्या कार्यकारी संपादक डॉ. वैशाली बालाजीवाले (Executive Editor Dr. Vaishali Balajiwale) यांनी रमण यांच्याशी संवाद साधला.

प्लम्बिंगसारख्या क्षेत्रात स्त्री कसे काम करू शकते, असा प्रश्न अनेकांना सहज पडेल, पण ऐश्वर्या रमण आज याच क्षेत्रात काम करीत आहेत. या चाकोरीबाह्य कामाची सुरुवात कशी झाली याची माहिती रमण यांनी दिली. त्यांनी सिव्हील अभियांत्रिकीत पदवीपर्यंतच (Degree in Civil Engineering) शिक्षण (Education) घेतले आहेत. पुढे जावून बांधकाम व्यवस्थापन (Construction management) विषयात मास्टर पदवी मिळवली.

सहायक प्राध्यापक म्हणून एका महाविद्यालयात अध्यापनकार्य करताना ‘प्लम्बिंग इंजिनिअरिंग’ (plumbing engineering) हा विषय त्यांना शिकवायला मिळाला. या विषयाची व्याप्ती किती मोठी आहे याचा त्यांना त्यावेळी प्रत्यय आला. पुढे याच क्षेत्रात अधिक संशोधन करण्यासाठी त्यांनी स्वतःला झोकून दिले.

पाऊस (Rain) आणि इतर कारणाने घराच्या छतावर साचणारे पाणी, त्याचे व्यवस्थापन (सिफोनिक रूफ ड्रेनेज) (Siphonic roof drainage) हा त्यांच्या कामाचा मुख्य विषय आहे. त्यासाठी अनेकदा विकसित आणि विकसनशील देशांत (developing countries) याच विषयावर काम करणार्‍या उद्योजकांसोबत त्यांच्या चर्चा होतात.

त्यावेळी एक महिला म्हणून न समजता त्या कामाविषयी तुम्हाला किती ज्ञान आहे ते महत्त्वाचे असते आणि त्यालाच महत्त्व दिले जाते. त्यामुळे आज याच क्षेत्रात पूर्ण आत्मविश्वासाने पुढे येऊन काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले. या क्षेत्रात काम करताना घराच्यांकडून मिळालेले भक्कम पाठबळ खूप महत्त्वाचे होते. आई उद्योजक असल्याने तिच्याकडून अधिक प्रोत्साहन मिळाले.

महिला असूनही कारकिर्दीसाठी रमण यांनी वेगळ्या क्षेत्राची निवड केली. त्या क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण करून कर्तृत्व सिद्ध केले. जगावेगळे काही करण्याची स्वप्ने पाहणार्‍या महिला आणि युवतींनी त्याबाबत विचार करण्यापेक्षा कृतीवर भर दिला पाहिजे. शक्य तितक्या नवीन लोकांना भेटा! त्यांच्याशी वेगळया विषयांवर चर्चा करा. तुम्हाला नवीन मार्ग नक्की सापडेल, असा संदेशही रमण यांनी दिला. देवीचे दयाळू, कनवाळू रूप मला अधिक भावते. आपण सगळे निसर्गाचा भाग आहोत. निसर्ग नि:स्वार्थी भावनेने सगळ्यांना मदत करतो. तसा इतरांना आपलाही मदतीचा हात पुढे करण्याचा स्वभाव असावा, असेही त्या म्हणाल्या.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com