राज्यभर थंडीत चढ-उतार

राज्यभर थंडीत चढ-उतार
Sandip Tirthpurikar

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

राज्यभर थंडीत (cold) चढ-उतार सुरु आहे. उत्तर भारतात (north india) पाठशिवणीच्या खेळाप्रमाणे एका पाठोपाठ लगेच पाठलाग करणार्‍या दोन पश्चिमी झंजावातात पुरेसा कालावधी न मिळाल्यामुळे थंडीचा अपेक्षित परिणाम जाणवत नाही.

पहिल्या आठवड्यात थंडी पडते-न-पडते तोच दुसर्‍या आठवड्यात हवेच्या कमी दाब क्षेत्राचे त्या थंडीवर (cold) आक्रमण होते. त्यामुळे थंडी विस्कळीत होवून किमान तापमानात (minimum temperature) सध्या वाढ होत आहे. उत्तर भारतात थंडी नाही म्हणून गुजरात (Gujrat) राज्यातही थंडीचा जोर ओसरला आहे. संपूर्ण महाराष्ट्रातही सध्या किमान तापमानात सरासरीपेक्षा 2-4 डिग्रीने वाढ होवून थंडीचा जोर कमी झाला आहे.

शिवाय ढगाळ वातावरण (Cloudy weather) जरी जाणवत नसले तरी अधिक उंचीपर्यन्त ढगाळ सदृश्य धुक्याचा (fog) मळभ आच्छादित असल्यामुळे रात्रीतून जमिनीतूनही उत्सर्जित होणारी दिर्घ लहरी उष्णता- ऊर्जा पूर्णपणे उत्सर्जित होत नसल्यामुळे किमान तापमानात अपेक्षित घसरण होत नाही. दिवसाही अशा वातावरणामुळे लघुलहरी उष्णता- ऊर्जा जमीन तापवत नाही. त्यामुळे हवेचा थरही शुष्क केला जात नाही. आणि त्यामुळे थंडी (cold) जाणवत नाही..

तरीदेखील उत्तरेकडून मंद झुळूक असणार्‍या वार्‍यावेगात अधिक वाढ झाल्यामुळे, उत्तर भारतात जी काही उपलब्ध थंडी आहे. तिचे वहन महाराष्ट्रात होत असल्यामुळे बोचर्‍या वार्‍यातुन दिवसा हवेत गारवा सध्या कमी अधिक प्रमाणात जाणवतच आहे. अजुन चार-पाच दिवसात वातावरण निवळण्याची अपेक्षा हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com