नाशकात पूरसदृश्य स्थिती कायम; 'या' धरणातून होतोय इतका विसर्ग

नाशकात पूरसदृश्य स्थिती कायम; 'या' धरणातून होतोय इतका विसर्ग

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिकसह (Nashik), इगतपुरी (Igatpuri), त्र्यंबक (Trimbakeshwar) आणि दिंडोरीत (Dindori) सुरु असलेल्या संततधार पावसामुळे धरणे भरली आहेत. धरणातून विसर्ग सुरु झाला आहे. त्यामुळे गोदावरी नदीसह (Godavari River) अनेक उपनद्या दुथडी भरून वाहत आहेत. सद्यस्थितीत गोदावरीतील पूरसदृश्य स्थिती कायम आहे. आजही पावसाचे वातावरण असून इगतपुरी, त्र्यंबक तालुक्यात पावसाची संततधार सुरु आहे....

नाशकात पूरसदृश्य स्थिती कायम; 'या' धरणातून होतोय इतका विसर्ग
अखेर मुळा धरणातून जायकवाडीकडे पाणी झेपावले

आज दुपारच्या आकडेवारीनुसार, दारणा (Darna) धरणातून १२ हजार ७८८ क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जाता इह. तर कडवाचा (Kadwa) विसर्ग दुपारी १२ वाजता वाढविण्यात आला आहे.

आळंदी (Alandi) धरणातून ८० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. वालदेवी धरणातून १८३ क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे.

नाशकात पूरसदृश्य स्थिती कायम; 'या' धरणातून होतोय इतका विसर्ग
गोदावरीत 24 हजार क्युसेकने विसर्ग!

गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग घटविण्यात आला असून सद्यस्थितीत दोन हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे.

दुसरीकडे नांदूरमध्यमेश्वर धरणातून २० हजार ८२३ क्युसेक पाण्याचा विसर्ग होता आहे. कडवा च्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यामुळे विसर्ग वाढला परिणामी पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com