Video : गोदामाईला दुसऱ्यांदा पूरसदृश्य स्थिती; दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत आले पाणी

मंदिरे पाण्याखाली; व्यावसायिकांची धावपळ

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिकमध्ये गोदावरीत पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. (Flood situation at Godavari river) आज दुपारी एक वाजेच्या सुमारास गोदावरीच्या पुराचे परिमाण असलेल्या दुतोंड्या मारुतीच्या (Dutondya maruti) छातीपर्यंत पाणी लागले आहे. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अशीच संततधार सुरु राहिल्यास आणखीही पाण्याचा विसर्ग गोदावरीत केला जाण्याची शक्यता वर्तविली जाते आहे....

गंगापूर धरणातून (Gangapur Dam) पाणी सोडल्यानंतर दोन तासांत या पाण्याचा प्रभाव होळकर पुलाखाली दिसून येतो. अकरा वाजता सोडलेला पाण्याचा विसर्ग एक वाजेच्या सुमारास दिसून आला. गोदावरी नदी दुथडी भरून वाहताना दिसून आली.

Video : गोदामाईला दुसऱ्यांदा पूरसदृश्य स्थिती; दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत आले पाणी
गोदावरीला येणार पूर; गंगापूरमधून होणार मोठ्या प्रमाणात विसर्ग

गंगेवरील रामकुंड (Ramkund) परिसरातील साई किरण धामचे साई बाबा मंदिराच्या गाभाऱ्यात पाणी शिरले. तर दुपारचा प्रसादही आज गुडघाभर पाण्यात उभे राहून करण्यात आल्याचे दिसून आले.

Video : गोदामाईला दुसऱ्यांदा पूरसदृश्य स्थिती; दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत आले पाणी
Video : नाशिक जिल्ह्यात पावसाचे जोरदार 'कमबॅक'

साई मंदिरातील साहित्य हलविण्यात आले. परिसरातील चक्रधर स्वामी, बाणेश्वर, कर्पुरेश्वर, त्यागेश्वर, सिध्दपाताळेश्वर, विठ्ठल-रुक्मिणी, गंगा गोदावरी नीलकंठेश्वर त्यागेश्वर महादेव मंदिर, राममंदिर आदी मंदिरांना पाण्याने वेढा घातलेला दिसून आले. अनेक लहान मंदिरे तर बुडण्याचा मार्गावर दिसत आहेत. (Temples in Water)

गोदाकाठच्या व्यावसायिकांची धावपळ

गोदाकाठी पाणी वाढल्यामुळे अनेक व्यावसायिकांनी आपली दुकाने सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी धावपळ उडाली. एकमेकांना मदत करून अनेकांनी ही दुकाने पाणी वाढलेले असताना सुरक्षित स्थळी हलवली. अनेकांनी दुकाने तिथेच सोडत दुकानातील माल काढून नेण्यास प्राधान्य दिलेले दिसून आले.

Related Stories

No stories found.