पुराचा अंदाज सांगणारे मॉडेल विकसित

मुख्य अभियंता हनुमंतराव धुमाळ यांचे संशोधन
पुराचा अंदाज सांगणारे मॉडेल विकसित
USER

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

कृष्णा खोरे विकास महामंडळाचे मुख्य अभियंता Chief Engineer, Krishna Valley Development Corporation हनुमंतराव धुमाळ Hanumantrao Dhumal यांनी राज्यातील पुराचा अंदाज सांगणारे मॉडेल A flood forecasting model विकसित केले आहे. त्यामुळे दक्षिण महाराष्ट्र आणि कोकणातील पूरपरिस्थितीची माहिती 24 ते 48 तास अगोदरच समजणार आहे.

गेल्या काही वर्षांपासून दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगलीचा पट्टा तसेच कोकणातील काही जिल्ह्यांना दरवर्षी पावसाळ्यात पुराचा तडाखा सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर श्रीगोंद्याचे ( जि. अहमदनगर) सुपुत्र हनुमंतराव धुमाळ यांनी पुण्यातील डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी संशोधन केंद्रात पीएच. डी. करताना पुराचा अचूक अंदाज सांगणारे संगणकीय मॉडेल विकसित केले. पूरग्रस्त परिस्थितीचा वेध घेण्यासाठी हे संशोधन मोलाचे ठरणार आहे.

महाराष्ट्रातील पूरपरिस्थिती Flood आणि त्यावरील उपाययोजना हा धुमाळ यांच्या संशोधनाचा विषय होता. या विषयासाठी त्यांनी संगणकीय मॉडेल विकसित केले. नदीच्या उर्ध्व भागातील पाणीपातळी, अन्य नद्यांची पाणी पातळी, नदीचा प्रवाह आणि त्या भागात पडणारा पाऊस आदी बाबींचा या मॉडेलमध्ये समावेश आहे. ही माहिती प्रत्येक तासाला मॉडेलमध्ये भरली तर पूरप्रवण भागात पुढील 24 ते 48 तासांत किती पाणी पातळी असू शकते, याचा अंदाज आधीच बांधणे शक्य होणार आहे.

कर्नाटकातील अलमट्टी, हिप्परगी धरणांचा फुगवटा आणि महाराष्ट्रातील उर्ध्व भागातील धरणांतून सोडलेल्या पाण्याचा पुरावर होणारा परिणाम यावरही धुमाळ यांनी संशोधन केले. कृष्णा नदीवरील पंचगंगा- कृष्णा, वारणा-कृष्णा या नद्यांच्या संगमावर होणारा पाण्याचा फुगवटा, त्याचा दोन उपनद्यांवर होणारा परिणाम तसेच कृष्णा नदीच्या नागमोडी वळणाचा तसेच संथ प्रवाहाचा अभ्यासही या संशोधनाद्वारे करण्यात आला आहे. या संशोधनात धुमाळ यांना पुण्यातील अनंतराव पवार अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील ठाकरे, विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे प्रा. डॉ. श्रीनिवास लोंढे यांचे मार्गदर्शन लाभले. जलसंपदा मंत्री जयंत पाटील, कृष्णा खोरे महामंडळाचे कार्यकारी संचालक विलास राजपूत, डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे प्राचार्य डॉ. प्रमोद पाटील, संशोधन केंद्राच्या प्रमुख डॉ. कुलकर्णी, डॉ. राधिका मेनन, स्थापत्य विभागप्रमुख डॉ. दीपा जोशी, डॉ. श्रुती वडाळकर आदींचे बहुमोल सहकार्य लाभले.

नव्या संशोधकांना संधी

स्थानिक पातळीवरील पुराची कारणे तसेच पूर नियंत्रणासाठी करावयाच्या उपाययोजना यासाठी विकसित केलेले नवे मॉडेल उपयोगी ठरणार आहे. नव्या संशोधकांनी आपल्या संशोधनासाठी या मॉडेलचा उपयोग करून घ्यावा, असे आवाहन हनुमंतराव धुमाळ यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.