नाशिकहून गोवा, बंगळुरूसाठी विमानसेवा सुरु होणार

उद्योजक, व्यापारी व पर्यटकांसाठी पर्वणी
नाशिकहून गोवा, बंगळुरूसाठी विमानसेवा सुरु होणार

नाशिक | प्रतिनिधी Nashik

स्पाईस जेट विमान कंपनीच्या (Spice Jet Airlines) वतीने बंगळूरू-नाशिक-गोवा साठी (Bangalore-Nashik-Goa )विमान सेवेचे नवे टाईम वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. येत्या 25 सप्टंबर पासून ही सेवा सुरु करण्यात येणार असल्याचे आयमा एविएशन समितीचे मनिष रावल ( Aima Aviation Committee- Manish Raval )यांनी सांगितले.

दिल्लीसाठी यापूर्वीजेट एअरवेज, स्पाईस जेट यानी विमान सेवा सूरू केलेली होती. जेटच्या विमानसेवेला प्रवाश्यांसह कार्गो बूकींगला उदंड प्रतिसाद लाभत होता.मात्र त्यांची सेवा बंद पडल्यानंतर स्पाईस जेटने सेवा सूरू केली होती. कोविडमुळे ती बंद पडली होती 4 ऑगस्ट पासून परत सूरू करण्यात येत आहे. सध्या एअर अलायन्स द्वारे नाशिक-अहमदाबाद -दिल्ली अशी हॉपिंग सेवा उपलब्ध आहे. स्पाईस जेटची थेट दिल्ली सेवा उपलब्ध होणार आहे.

स्पाईस जेट विमान कंपनीद्वारे सध्या नाशिकहुन हैद्राबाद साठी विमान सेवा सूरू आहे. येत्या 4 ऑगष्ट पासून दिल्ली विमान सेवा सूरु करण्यात येणार आहे. दिल्लीहुन सकाळी 7.55 ला निघून विमान नाशिकला 9.45 ला पोहोचणार आह. तर नाशिकहुन परतीचा प्रवास 10.15 ला सूर करण्यात येईल व ते दिल्ली विमान तळावर 12.15 ला पोहोचेल.

याच मालिकेत स्पाईस जेटद्वारे 25 सप्टेंबर पासून बंगळूरू-नाशिक- गोवा ((Bangalore-Nashik-Goa ))अशी विमान सेवा सूरु करण्यात येणार आहे.यात बंगळूरूवरून दुपारी 23.35 ला विमान निघून ते नाशिकला दुपारी 2.35 वाजता पोहोचणार आहे.नाशिकहुन 2.55 ला निघून विमान गोव्याला 3.55 ला पोहोचणार आहे.तर गोव्याहून परतीच्या प्रवासासांठी सायंकाळी 17.35 ला विमान उड्डाण घेणार आहे. ते नाशिकला 18.35 ला पोहोचणार असून, नाशिकहुन 18.55 ला बंगळूरुसाठी उडाण घेउन त बंगळूरुला 20.55 ला पोहोचणार आहे.

दिल्ली व बंगळूरू गोवा विमान सेवा नाशिकच्या पर्यटनासोबतच उद्योजक व्यवपारी वर्गासाठी उपयुक्त ठंरणार असून उत्तर महाराष्ट्रातून गोव्याला जाणार्‍या पर्यटकांसाठी ही मोठी पर्वणीच ठरणार असल्याचे मत मनिष रावल यांनी व्यक्त केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com