Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिकहून दिल्ली, गोव्यासाठी विमानसेवा सुरु होणार

नाशिकहून दिल्ली, गोव्यासाठी विमानसेवा सुरु होणार

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक विमानतळावरुन अलायन्स एअर, स्टार एअर, व ट्रयूजेट या विमान कंपन्यांच्या माध्यमातून आडवड्याला 28 फेऱ्यांच्या माध्यमातून अहमदाबाद, पूणे, बेलगाम व हैद्राबाद साठी विमान सेवा सूरू आहेत. नव्याने ‘स्पाईस जेट’ Spice Jet Airlines च्या माध्यमातून दिल्ली व गोवा विमान सेवा Nashik- Delhi , Nashik-Goa Air Services सूरू होणार असल्याने उडान योजना आणखी गतिमान होण्यास मदत होणार आहे.

- Advertisement -

नाशिकहून गोवा आणि दिल्लीसाठी जानेवारीत स्पाइस जेट विमानसेवा सुरू करणार आहे. केंद्रीय नागरी हवाई वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया Union Minister of Civil Aviation Jyotiraditya Scindia यांनीच दिलेल्या पत्रातून हे स्पष्ट झाले आहे.

या नव्या सेवेमुळे दिल्लीला अवघ्या दोन तासांत तर गोव्याला त्यापेक्षा कमी वेळेत पोहोचणे शक्य होणार असून, पर्यटन, उद्योग, व्यापार क्षेत्राला या सेवेमुळे बूस्ट मिळू शकणार आहे. कंपनीकडून लवकरच या सेवेची अधिकृत घोषणा आणि वेळापत्रक जाहीर केले जाणार आहेत.

नाशिक-दिल्ली मार्गावर दीड वर्षापूर्वी जेट एअरवेजकडून सेवा दिली जात होती, या सेवाला शंभर टक्के प्रतिसाद मिळत होता. मात्र, आर्थिक संकटात कंपनी सापडल्यानंतर त्यांनी सर्वच सेवा बंद केल्या. याचा परिणाम नाशिक-दिल्ली सेवेवर झाला.

केंद्र सरकारच्या ’उडान’ योजनेंतर्गत ही सेवा सुरू होती, आता स्पाइस जेटकडून सेवा चालविली जाणार आहे. दिल्लीसोबतच गोव्याकरिताही ही सेवा सुरू होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या