शिवांगी सिंह राफेलच्या पहिल्या महिला वैमानिक

शिवांगी सिंह
शिवांगी सिंह

नवी दिल्ली

चीनसोबत सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर राफेलच्या ताफ्यात आता महिला वैमानिक नियुक्ती झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मतदार संघातील फ्लाईट लेफ्टनंट शिवांगी सिंह Flight Lieutenant Shivangi Singh यांची राफेलवर नियुक्ती झाली आहे.

राफेल लढाऊ विमानाचं उड्डाण करणाऱ्या त्या पहिल्या महिला वैमानिक बनल्या आहेत. देशातील सर्वात शक्तिशाली राफेल विमान उडवण्याची जबाबदारी मिळाली आहे. वाराणसीतील फुलवरिया भागात राहणाऱ्या शिवांगीच्या यशानंतर त्यांच्या कुटुंबात उत्साहाचं वातावरण आहे. शिवाय त्याच्या कुटुंबावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. योगायोग म्हणेज मागील वर्षी डिसेंबरमध्ये शिवांगी नावाचीच महिला भारतीय नौदलातील पहिल्या वैमानिक बनल्या होत्या.

प्रशिक्षण पूर्ण होताच राफेलमधून उड्डाण करणार

शिवांगी सिंह Conversion Training कन्वर्जन ट्रेनिंग पूर्ण करताच हवाई दलाच्या अंबाला (Ambala) एयरबेसवरील 17 Squadron Golden Arrows 17 गोल्डन एरोज स्क्वॉड्रनमध्ये औपचारिक प्रवेश करतील. एखाद्या वैमानिकाला एका लढाऊ विमानातून दुसऱ्या लढाऊ विमानात स्वीच करण्यासाठी कन्वर्जन ट्रेनिंग घेण्याची आवश्यता असते. सध्या त्या मिग 21 (MiG-21) या लढाऊ विमानाच्या वैमानिक आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी राफेल उडवणे तेवढे आव्हानात्मक नसेल, कारण ताशी 340 किमीवेग असलेले मिग-21 हे जगातील दुसरे सर्वात जलद लॅण्डिंग आणि टेकऑफ स्पीड असलेले विमान आहे.

शिवांगी सिंह यांचे बनारसमध्ये शिक्षण

बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमधून शिक्षण पूर्ण केलेल्या फ्लाईट लेफ्टनंट शिवांगी सिंह या महिला वैमानिकांच्या दुसऱ्या बॅडमधील आहे. मुलीच्या यशाबद्दल कुमारेश्वर सिंह म्हणाले, मुलीने आमचा गौरव वाढवला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com