Photo, Video : माती संवर्धनाच्या जनजागृतीसाठी ‘फ्लॅश मॉब’

सद्गुरू मोटारसायकल रॅलीद्वारे 27 देशांतून करणार 30 हजार किमी प्रवास
Photo, Video : माती संवर्धनाच्या जनजागृतीसाठी ‘फ्लॅश मॉब’

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

सद्गुरू जग्गी वासुदेव (sadhguru jaggi vasudev) यांनी मृदा संवर्धनासाठी जनजागृती अभियान सुरू केले आहे. त्यांच्या 100 दिवसांच्या यात्रेस शनिवारी लंडनमध्ये (London) प्रसिद्ध ट्रॅफलगार स्क्वेअरमध्ये हिरवा झेंडा दाखवण्यात आला....

जगभरात विनाशकारी संकट येऊ शकते. यूएन कन्व्हेन्शन टू कॉम्बॅट डेझर्टिफिकेशननुसार (UNCCD) पर्यंत 2050 पृथ्वीची 90 टक्के माती (Soil) खराब होऊ शकते. या पार्श्वभूमीवर 'माती वाचवा' (Save Soil) जनजागृती करण्यासाठी सद्गुरू मोटरसायकलवरुन जगाच्या प्रवासाला (Bike Rally) निघाले आहेत.

येत्या 11 जूनला नाशिकमध्ये (Nashik) ते जनसामान्यांशी संवाद साधणार आहेत. आज सिटीसेंटर मॉलमध्ये सद्गुरूंच्या सेवकांनी जनजागृती करण्यासाठी ‘फ्लॅश मॉब’ (Flash Mob) केले. दि. ११ जूनचा सद्गुरूंचा कार्यक्रम देशदूत आणि मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या संयुक्त विद्यमाने मविप्र मैदानावर आयोजित करण्यात आला आहे.

जमिनीची धूप तत्काळ सद्गूरूंनी रोखण्यासाठी जागरूक अभियान सुरू केले आहे. ते मोटारसायकलवर एकटे 30हजार किमी प्रवास करीत युरोपमध्ये पोहोचले आहेत. या प्रवासात ब्रिटन, युरोप आणि मध्य-पूर्वेतील देशांसह 27 देशांतून प्रवास करुन भारतात (India) पोहोचणार आहेत.

याबाबत जनसामान्यांना जागृत करण्यासाठी व या उपक्रमात सहभागी करुन घेण्यासांठी विशेष ‘फ्लॅशमॉब’चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जमिनीच्या क्षतीमुळे मनुष्याची होणारी संभाव्य हानी लक्षात घेऊन मृदा संवर्धनाचा संदेश देणारे पथनाट्य याठिकाणी सादर करण्यात आले. त्यासोबतच नृत्य, ढोल पथक, रॅली, पथ नाट्य, संगीत याद्वारे सुमारे दीड ते दोन तास सेवकांनी जनजागृती केली.

या मोटरसायकलद्वारे सूरू झालेल्या यात्रेदरम्यान सद्गुरूंनी जगातील प्रमुख नेते, प्रसार माध्यम आणि प्रमुख तज्ज्ञांशी केलेली चर्चा, मृदा संवर्धनासाठी संघटित काम करण्याच्या आवश्यकतेवरचे त्यांचे मनोगत सिटीसेंटर मॉल (City Center Mall) येथे चित्रफितीद्वारे प्रसारित करण्यात आले.

Related Stories

No stories found.