देशदूत कार्यालयात ध्वजारोहण

देशदूत कार्यालयात ध्वजारोहण

नाशिक | प्रतिनिधी Nashik

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या ( Swatantryacha Amrut Mahotsav )निमित्ताने 'देशदूत' कार्यालयात ( Deshdoot Office )ध्वजारोहण करण्यात आले. सुरुवातीला दै. 'देशदूत'च्या कार्यकारी संपादक डॉ. वैशाली बालाजीवाले यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाबद्दल माहिती सांगितली.

आपल्या प्रास्ताविकातून त्यांनी ‘घरोघरी तिरंगा’ या केंद्र शासनाच्या अभियानास सर्व नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. त्याबद्दल त्यांनी समाधानही व्यक्त केले.स्वातंत्र्यांच्या इतिहासाचा मागोवा राजेंद्र पवार यांनी घेतला. सामुदायीक राष्ट्रगितातून राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली.

यावेळी वाहतूक शाखेच्या युनिटक्र. 2 चे अंमलदार भालचंद्र साळुंखे, अशोक सोनवणे, बाळासाहेब जाधव, स्वप्निल गांगुर्डे यांचा देशदूतचे कार्मिक व्यवस्थापक सुनील ठाकूर, मार्केटिंग विभागाचे महाव्यवस्थापक अमोल घावरे, इडीपी विभाग प्रमुख मयुरी कुलकर्णी यांच्या हस्ते प्रतिनिधीक सत्कार करण्यात आला.

‘घरोघरी तिरंगा’ या अभियानांतर्गत प्रत्येक घरावर झेंडा फडकला. आता मात्र प्रत्येक नागरिकाच्या मनात तिरंगा फडकू दे, नागरिकांच्या मनात ‘राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्ती, देशप्रेम नांदू दे’ ‘भ्रष्टाचारमुक्त व व्यसनमुक्त सुदृढ नागरिक राहू दे’ अशी अपेक्षा सर्वांनी व्यक्त केली. यावेळी देशदूत परिवारातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com