Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिक जिल्ह्यात आजपर्यंत ५ हजार ३९४ करोना रुग्णांना डिस्चार्ज

नाशिक जिल्ह्यात आजपर्यंत ५ हजार ३९४ करोना रुग्णांना डिस्चार्ज

नाशिक : नाशिक शहर तसेच जिल्ह्यात करोनाचा उद्रेक वाढत चालला आहे. गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात ३३१ रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेत. यामुळे जिल्ह्यात करोनाग्रस्तांची एकुण संख्या ८ हजार ९४ झाली आहे.

तर एकाच दिवसात जिल्ह्यातून ८७८ नवे संशयित दाखल झाले आहेत. आज शहरासह जिल्ह्यातील ६ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर एकाच दिवसात १८५ रूग्णांनी करोनावर मात केली आहे.

- Advertisement -

जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ५ हजार ३९४ करोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत २ हजार ४०६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

आत्तापर्यंत ३६५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली.

नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक १०६, चांदवड १०, सिन्नर ९६, दिंडोरी ३९, निफाड ९४, देवळा १३, नांदगांव ५१, येवला ४४, त्र्यंबकेश्वर २५, सुरगाणा ०८, पेठ १०, कळवण ११, बागलाण १४, इगतपुरी ६१, मालेगांव ग्रामीण ४१ असे एकूण ६२३ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहेत.

तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात १ हजार ६१८ , मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात १४७ तर जिल्ह्याबाहेरील १८ असे एकूण २ हजार ४०६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात ८ हजार १६५ रुग्ण आढळून आले आहेत.

नाशिक ग्रामीण ७९ ,नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून १९३ , मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ७९ व जिल्हा बाहेरील १४ अशा एकूण ३६५ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

८ हजार १६५ कोरोनाबाधित रुग्णांपैकी ५ हजार ३९४ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले २ हजार ४०६ पॉझिटिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार सुरु आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या