Saturday, April 27, 2024
Homeदेश विदेशमोठी कारवाई! जम्मू-काश्मीरच्या कुपवाड्यात पाच दहशतवादी ठार

मोठी कारवाई! जम्मू-काश्मीरच्या कुपवाड्यात पाच दहशतवादी ठार

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

जम्मू-काश्मीरच्या (Jammu-Kashmir) कुपवाडा जिल्ह्यातील एलओसीच्या जुमागुंड भागात शुक्रवारी सकाळी सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यात पाच दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले आहे…

- Advertisement -

परिसरात सुरक्षा दलांचे ऑपरेशन अद्यापही सुरूच आहे. लपून बसलेल्या दहशतवाद्यांचा शोध सुरक्षा दल घेत आहे. घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रे जप्त करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

Manipur Violence : मणिपूर धगधगतंच! केंद्रीय मंत्र्यांचं घर जाळलं, सुरक्षारक्षक बघत राहिले, कारण…

कुपवाडा (Jammu Kashmir) जिल्ह्यातील जुमागुंड भागात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. माहिती मिळताच सुरक्षा दलाच्या जवानांनी शोधमोहिम सुरू केली होती. शोधमोहिम राबवताना काही दहशतवाद्यांनी पोलिस आणि सुरक्षा रक्षक जवानांवर अचानक गोळीबार सुरू केला. यावेळी जवानांनीही दहशतवाद्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. या चकमकीत पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या