निफाडमध्ये बनावट मद्यानंतर आता नकली नोटांचा काळाबाजार; महिला डॉक्टरसह पाच अटकेत

निफाडमध्ये बनावट मद्यानंतर आता नकली नोटांचा काळाबाजार; महिला डॉक्टरसह पाच अटकेत

लासलगाव | वार्ताहर Lasalgaon

लासलगाव (Lasalgaon) पाचशे रूपयांच्या बनावट चलनी नोटा व्यवहारात आणऱ्या टोळीचा पर्दाफाश लासलगाव पोलीसांनी (Lasalgaon Police Station) केला आहे. याप्रकरणी एका महिला डॉक्टरसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे... (Six arrested including woman doctor from laslgaon)

लासलगावचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल वाघ (Lasalgaon API Rahul Patil) यांनी दिलेल्या माहितीनुसार, काल (दि १२) रोजी गुप्त माहितीनुसार येवला रोड विंचुर (Yeola Road Vinchur) येथे दोन व्यक्ती बनावट ५०० रुपयांच्या काही नोटा देण्यासाठी येत असल्याचे समजले होते. त्यानुसार, सापळा रचण्यात आला.

यावेळी येथील संशयित मोहन पाटील, प्रतिभा घायाळ, विठठल नावरीया यांना बनावट ५०० रुपयांच्या २९१ नोटा देण्यासाठी आळे होते. त्यांच्याकडील इटीऑस कार क्रमांक एमएच ३ सीएच ३७६२ ने आले होते. यावेळी छापा टाकुन त्यांच्याकडुन ५०० रुपये दराच्या बनावट २९१ नोटा व इटीऑस कार किमंत अंदाजे ४ लाख रुपये जप्त करण्यात आली आहे.

रविंद्र हिरामण राऊत (रा स्मारक नगर पेठ ता पेठ जि नाशिक) व विनोद मोहनभाई पटेल (रा चाणक्य बिल्डींग ओमकार बंगल्याजवळ, सुर्यवंशीरोड पंचवटी नाशिक) अशी या दोन्ही संशयितांची नावे आहेत. लासलगाव येथील मोहन बाबुराव पाटील व डॉ. प्रतिभा बाबुराव घायाळ दोन्ही रा. बोराडे हॉस्पीटल जवळ लासलगाव व विठ्ठल चपलाल नाबरीया, रा कृषीनगर, कोटमगाव रोड लासलगाव ता. निफाड यांच्याकडे याबाबतची सखोल चौकशी केली असता त्यांनी आमचा मित्र रविंद्र राऊत, व विनोद पटेल हे आम्हाला सायंकाळी बनावट ५०० रुपयांच्या चलनी नोटा देणार असल्याचे सांगितले.

पोलिस अधीक्षक सचिन पाटील (SP Nashik Sachin Patil), अप्पर पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे (Additional madhuri kangane), पोलीस उपअधीक्षक सोमनाथ तांबे (DSP Somnath Tambe) यांनी केलेल्या मार्गदर्शनाने लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक रामकृष्ण सोनवणे (PSI Ramkrushna Sonawane), सपोउनि राजेंद्र अहिरे पोलीस हवालदार बाळु सांगळे पोलीस नाईक कैलास महाजन योगेश शिंदे संदिप शिंदे, पोका प्रदिप आजगे, गणेश बागुल, कैलास मानकर, सागर आरोटे देविदास पानसरे महिला पोलिस शिपाई मनीषा शिंदे या पथकाने कारवाई केली.

वरील संशयितांनी भारतीय चलनातील ५०० दराच्या बनावट २९१ नोटा व्यवहारात आण्ण्यासाठी आपल्या ताब्यात बाळगल्या म्हणून पोकों प्रदिप आजगे यांच्या फिर्यादीवरुन लासलगाव पोलीस स्टेशनला वरील इसमांविरुध्द भादवि कलम ४८९ क ई प्रमाणे . गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहा पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस पोउनि रामकृष्ण सोनवणे हे करीत आहे.

Related Stories

No stories found.