
नाशिक | प्रतिनिधी Nashik
पूर्ववैमनस्य व जुने वादावरून तलवार व कोयत्याने हल्ला करुन दोन जणांचा खून केल्याप्रकरणी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने पाच जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश वि. पी देसाई यांनी निकाल दिला.
२७ डिसेंबर २०१७ रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास राजीव नगर झोपडपट्टी लगत रवी गौतम निकाळजे, दीपक दत्ता व्हावळ, कृष्णा दादाराम शिंदे, नितीन उत्तम पंडित, आकाश उर्फ बबलू डंबाळे यांनी दिनेश निळकंठ मिराजदार (२२) देविदास वसंत ईघे (२२) यांच्यावर हल्ला केला होता.त्यात या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
या चारही हल्लेखोरांना न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात रिक्षा चालक रमेश भीमराव गायकवाड यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्याची सुनावणी न्यायालयात जुलै २०१८ पासून सुरू होती. खटल्यात जिल्हा सरकारी वकील अजय मिसर यांनी सरकार पक्षातर्फे कामकाज बघून एकूण १९ साक्षीदारांची साक्ष नोंदवली होती.