प्रवाशांनी भरलेल्‍या रिक्षाला ट्रकची धडक; ५ जण जागीच ठार

प्रवाशांनी भरलेल्‍या रिक्षाला ट्रकची धडक; ५ जण जागीच ठार

नांदेड | Nanded

येथील नांदेड ते मुदखेड मार्गावरील (Nanded to Mudkhed Route) इजळी पाटीजवळ ट्रक आणि रिक्षाची धडक झाल्याने भीषण अपघात (Accident) घडला आहे. या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला असून यात एका लहान मुलाचा आणि एका वृद्ध व्यक्तीचा समावेश आहे...

प्रवाशांनी भरलेल्‍या रिक्षाला ट्रकची धडक; ५ जण जागीच ठार
... हा महाराष्ट्राचा अपमान नाही का? ; अजित पवारांचा राज्य सरकारवर हल्लाबोल

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, प्रवाशांनी भरलेली रिक्षा नांदेडकडे जात होती. त्यावेळी नांदेडकडून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने रिक्षाला जोरदार धडक दिली. यात रिक्षा दूरवर फेकली गेली. या रिक्षामध्ये जवळपास १५ प्रवाशी (Passenger) होते. हे सर्वजण वाजेगाव येथे मजुरीसाठी जात होते.

प्रवाशांनी भरलेल्‍या रिक्षाला ट्रकची धडक; ५ जण जागीच ठार
छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन गटात राडा; परिस्थिती नियंत्रणात

दरम्यान, हा अपघात इतका भीषण होता की, अपघातात ४ प्रवाशांचा जागीच (Death) तर एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच अन्य ६ प्रवाशी गंभीर जखमी (Injured) झाले असून त्यांच्यावर नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा..

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com