तलावात बुडून पाच जणांचा मृत्यू

तलावात बुडून पाच जणांचा मृत्यू

मुंबई | Mumbai

नांदेड जिल्ह्यातील (Nanded District) कंधार (Kandahar) येथील एकाच कुटुंबातील पाच जणांचा जगतुंग तलावात (Jagtung Lake) बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे...

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड शहरातील खुदबई नगर (Khudbai Nagar) येथील दोन कुटुंब कंधार येथील दर्गाच्या दर्शनासाठी गेले होते. यातील महिला आणि लहान मुले (women and children) दर्गामध्ये होते. तर पाच जण तलावात पोहण्यासाठी गेले होते. परंतु पाण्याचा (Water) अंदाज न आल्याने ते पाचही जण बुडाले. यामध्ये दोन सख्खे भाऊ व अन्य तीन जणांचा समावेश आहे.

दरम्यान, मृत्यू (Death) पावलेले सर्वजण १३ ते २३ वयोगटातील आहे. तर महोमद साद, सय्यद सोहेल, सय्यद नाविद आणि महोमद आफ्रिदीन अशी मृतकांची नावे आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com