
नाशिक | Nashik
धुळ्यातील (Dhule) मुंबई- आग्रा महामार्गावर (Mumbai-Aagra Highway) भीषण अपघात (Accident) झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू (Death) झाला असून १५ ते २० जण गंभीररित्या जखमी झाल्याचे समजते. तसेच मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे...
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, धुळे-मुंबई-आग्रा महामार्गावर (Dhule-Mumbai-Aagra Highway) शिरपूर तालुक्यातील (Shirpur Taluka) पळासनेर गावाजवळ (Palasner Village) भरधाव कंटेनरचे ब्रेक फेल झाल्याने हा अपघात घडला असून कंटेनर थेट एका हॉटेलमध्ये घुसला. त्यावेळी पाच जणांचा कंटेनर खाली चिरडून जागीच मृत्यू झाला. तर १५ ते २० जण जखमी असल्याचे बोलले जात आहे. दुपारी बारा वाजेच्या सुमारास हा अपघात झाल्याचे कळते.
दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच पोलीस (Police) घटनास्थळी दाखल झाले असून जखमींची मदत केली जात आहे. तसेच अपघातस्थळी मोठ्या संख्येने जमाव एकत्र आल्याची माहिती समोर आली आहे.