Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याIMD राज्यात पाच दिवस मुसळधार!

IMD राज्यात पाच दिवस मुसळधार!

पुणे । वृत्तसंस्था Pune

महाराष्ट्रात Maharashtra State पुढील 5 दिवस राज्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस Rain पडण्याचा इशारा हवामान विभागाने Meteorological Department दिला आहे. दक्षिण कोकणासह घाट परिसर तसेच मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुढील काही तासांत या भागात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

- Advertisement -

हवामान विभागाने आज पुण्यासह नाशिक, अहमदनगर, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, औरंगाबाद, बीड, जालना या 10 जिल्ह्यांसाठी ङ्गयेलो अलर्टफ जारी केला आहे. या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. पुढील 5 दिवस दक्षिण कोकणसह (पान 8 वर)

घाट परिसरात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेले शाहीन चक्रीवादळ तीव्र बनले आहे. ओमन देशाच्या किनारपट्टीवर ते धडकले असून तेथे पावसाचे थैमान सुरू आहे. येथील मस्कटसह अनेक शहरे जलमय होऊन पूरस्थिती उद्भवली आहे. त्यात आता केरळजवळच्या अरबी समुद्रात नवे संकट उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पुढील 48 तासांत येथे हवेच्या कमी दाबाचा पट्टा सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवस केरळ, गोवा, कर्नाटक तसेच महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या