Saturday, May 11, 2024
Homeमुख्य बातम्यानाशकात पाच नागरिकांना एकत्र येण्यास मज्जाव; 'हे' आहे कारण

नाशकात पाच नागरिकांना एकत्र येण्यास मज्जाव; ‘हे’ आहे कारण

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिककरांसाठी एका महत्वाची बातमी समोर येत आहे. आज पोलीस आयुक्त दीपक पांडेय (Deepak Pandey) यांनी शहरात मनाई आदेश जारी केला आहे…

- Advertisement -

त्यानुसार आजपासून 20 तारखेपर्यंत पाच किंवा त्यापेक्षा अधिक नागरिकांना एकत्र येणे आणि मिरवणूक काढण्यावर बंदी घालण्यात आली आहे. जर मिरवणूक काढायची असेल तर पोलीस आयुक्तांची परवानगी आवश्यक आहे असेदेखील या आदेशात म्हटले आहे….

सध्या मुस्लिम बांधवांचा रमजानचा पवित्र महिना सुरु आहे. यासोबतच १० एप्रिल रोजी रामनवमी, १२ एप्रिल रोजी रामरथ व गरुडरथ, १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती,१५ एप्रिल रोजी गुडफ्रायडे,व १६ एप्रिल रोजी हनुमान जयंती असे सण व उत्सव आहेत.

या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याकरिता पाच किंवा पाच पेक्षा जास्त लोकांना एकत्र जमण्यास बंदी केली असून पोलीस आयुक्तांची लेखी परवानगी शिवाय पाच पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. तसेच जमावबंदीचे आदेश लग्नकार्य, धार्मिकविधी, प्रेतयात्रा, सिनेमागृहांना लागू नसल्याचेही परिपत्रकात स्पष्ट केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या