विराट अनुष्का कन्येचा पहिला फोटो

jalgaon-digital
1 Min Read

नवी दिल्ली

अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली यांना सोमवारी कन्यारत्न झाले आहे. विराट कोहलीने स्वत: सोशल मीडियावर याबाबत आपल्या चाहत्यांना माहिती दिली होती. आता त्यांच्या कन्येचा पहिला फोटो समोर आला आहे.

काल विराटने केलेल्या पोस्टमध्ये म्हटले होते की, आम्हाला दोघांना हे सांगताना अत्यंत आनंद होत आहे की आज दुपारी आमच्या मुलीचा जन्म झाला. तुमचं प्रेम आणि आशीर्वाद यांसाठी आम्ही खूप आभारी आहोत. आम्हाला थोडी प्रायव्हसी हवी असेल हे तुम्ही नक्कीच समजू शकता, अशा आशयाची पोस्ट विराटने शेअर केली.

विराट कोहलीचा भाऊ विकास यांनी पुतणीच्या स्वागतासाठी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात बाळाचे पाय दिसत आहेत. हा विराट आणि अनुष्काच्या बाळाचा पहिला फोटो असल्याचे समजते. त्यांनी बाळाचे स्वागत केले असून बाळाच्या आगमनाने कुटुंब खूप आनंदित असल्याचे म्हटले आहे.

Share This Article