गोदावरीला आला पहिला पूर; नाशिकमध्ये कोसळधार

गोदावरीला आला पहिला पूर; नाशिकमध्ये कोसळधार

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

सलग चार दिवस सुरु असलेल्या मुसळधार पावसाने (Rain) आज गोदावरीला पूर (Flood) आला; गंगापूर धरण लाभक्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने गंगापूर धरणाची (Gangapur Dam) पातळी चार दिवसात ४० टक्क्यांनी वाढली...

गुरुवारी (दि. ७) रोजी २६ टक्के असलेली धरणसाठा आज (दि ११) रोजी ६५ टक्क्यांपर्यंत पोहचला. पाऊस (Rain) सुरूच असल्याने गंगापूर धरणातून दिवसभरात दहा हजार क्यूसेक्स पोणी सोडल्याने यंदाच्या पावसाळ्यातील पहिला पूर नाशिककरांनी अनुभवला.

उत्तर महाराष्ट्रात हवामान विभागाने (IMD) १४ तारखेपर्यंत रेड अलर्ट (Red Alert) घोषित केलेला असल्याने पावसाची (Rain) तीव्रता वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नाशिक शहर परिसरात चार दिवसांपासून संतत धार पाऊस सूरू होता. काल सकाळपासून पावसाने जोर धरल्याने शहराच्या विविध भागातून वाहून येणार्‍या पावसामुळे नदी पात्रात पाण्याची पातळी कमालीची वाढली होती. त्यात धरण परिसरातही मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने धरण पातळीत वोढ झाली होती.

परिणामी सूरक्षिततेचा उपाय म्हणून प्रशासनाने दहा हजार क्यूसेक्स पाणी सोडण्याचा निर्णय घेतल्याने नदी किनारच्या लोकांची एकच धावपळ उडाली.नागरिकांना सूरक्षित स्थळावर हलवण्यात आले.

गंगेच्यां काठावर व्यवसाय करणार्‍यांची तर तारांबळच उडाली. पूराच्या पाण्याने दुकानात साठणार्‍या चिखलाच्या भितीने दुकानातील सर्वच माल काढून नेण्यासाठी मोठी धावपळ सूरू होती.

टपरी धारकांनी सराफ बाजाराच्या रस्त्यावर टपर्‍या हटवून सूरक्षित करण्याचा प्रयत्न चालवलेला होता. गोदाघाटावरील छोटी छोटी मंदिरे तसेच रामसेतू पाण्याखाली गेला आहे. पुराचे मापक समजले जाणारे दुतोंड्या मारुती हा मानेपर्यंत बुडाला आहे.

प्रशासनाने पहिल्या टप्पात 1500 क्यूसेस, त्यानंतर 3 हजार क्यूसे, त्यानंतर लगेचच 5 हजार क्यूसेक्स, अन शेवटी १० हजार क्यूसेक्स पाणी सोडण्याचा निर्णय घेतल्याने नदी काठी राहणार्‍या नागरीकांमध्येही भिती दाटली होती.

नाशिकमध्ये गेल्या तीन दिवसांपासून सर्वत्र जोरदार पाऊस पडत असून नदी नाल्यांना पूर आला आहे. हवामान विभागामार्फत उद्यापासून नाशिक जिल्ह्यासाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे तरी नदी काठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी. प्रशासनाने खबरदारीचे उपाय राबवून नागरिकांना सर्व प्रकारची मदत व आवश्यक साहाय्य करावे.

- छगन भुजबळ, माजी उपमुख्यमंत्री

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com