Saturday, April 27, 2024
Homeदेश विदेशआरोग्यमंत्री म्हणाले, देशात जानेवारीमध्ये लसीकरणाला सुरुवात

आरोग्यमंत्री म्हणाले, देशात जानेवारीमध्ये लसीकरणाला सुरुवात

नवी दिल्ली

भारतात जानेवारी महिन्यापासून कोरोना लसीचा पहिला डोस दिला जाणार असल्याचे संकेत केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सोमवारी दिले आहेत. आधी ३० कोटी लोकांना ही लस देण्यात येणार आहे. भारतात कदाचित कोरोना महामारीचा सर्वात वाईट काळ संपला आहे, असे ते म्हणाले.

- Advertisement -

हर्षवर्धन यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, जानेवारीच्या कोणत्याही आठवड्यात आम्ही भारतात कोरोना लसीचा पहिला डोस देण्याच्या तयारीत आहोत. आमची पहिली प्राथमिकता लसींची सुरक्षा आणि परिणामकारकता आहे. आम्हाला यावर तडजोड करण्याची इच्छा नाही.

भारतात ८ चाचण्या

भारतात सध्या एकूण ८ लसीच्या चाचण्या सुरू आहेत. या सर्व चाचण्या वेगवेगळ्या टप्प्यात आहेत. काही आगाऊ स्टेजवर आहेत तर काही शेवटच्या टप्प्यात आहेत. ऑक्सफोर्ड आणि अ‍ॅस्ट्रॅजेनेकाची लस कोविशिल्ड आहे. त्याची चाचणी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया करत आहे. या लसीच्या चाचणीचा तिसरा टप्पा चालू असून अंतिम टप्प्यात आहे. द भारताच्या ड्रग रेगुलेटर, ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे आपत्कालीन वापरासाठी परवानगी मागितली आहे.

रिकव्हरी रेट सर्वोत्तम

देशात संसर्गाची एक कोटी प्रकरणे झाली आहेत. यापैकी ९५ लाखाहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. आपला रिकव्हरी रेट जगात सर्वाधिक आहे. काही महिन्यांपूर्वी देशात कोरोनाची १० लाख सक्रिय प्रकरणे होती, ती आता जवळपास तीन लाखांवर आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या