
नागपूर | Nagpur
रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) हस्ते लोकार्पण झालेल्या समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) पहिल्या अपघात झाला आहे...
वायफळ टोल नाक्यावर दोन कारमध्ये हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. सुदैवाने यात कोणीही गंभीर जखमी झालेले नाही. मात्र दोन्ही कारचे नुकसान झाले आहे.
समृद्धी महामार्गाचा प्रवेशद्वार असलेल्या वायफळ टोलनाक्याजवळ हा अपघात झाला. टोलनाका जवळ आला म्हणून एका गाडीने वेग कमी केला. तेवढ्यात मागून एक कार वेगाने आली व त्या गाडीवर धडकली.
टोलनाक्यावर असलेले कर्मचारी तत्काळ अपघात झालेल्या वाहनांजवळ गेले. दोन्ही वाहनांतील प्रवाशांपैकी कोणीही जखमी झाले नाही. वाहनांचे नुकसान झाले. दोन्ही कारचालकांनी सामोपचाराने तोडगा काढला व त्यामुळे पोलिसांत तक्रार दाखल झाली नाही.
दरम्यान, रविवारी समृद्धी महामार्गाचे उद्घाटन करण्यात आले. नागपूर ते मुंबई प्रवास १६ तासांवरुन ८ तासांवर आणणारा हा महामार्ग आहे. या महामार्गाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आले आहे.